मुंबई 08 ऑगस्ट: मराठी असो व बॉलिवूड कलाकारांना अनेक रूपात त्यांचे चाहते नेहमी भेटत असतात. कधी भेटवस्तू देणारे, सेल्फी काढणारे तर कधी त्यांना बघूनच भारावून जाणारे चाहते कलाकारांना सुद्धा नेहमीच आवडत आले आहेत. सध्या असाच एक अनुभव अभिनेते अनुपम खेर यांना आला आहे. मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये त्यांना एक मायलेकींनी जोडी भेटल्याचं दिसून आलं आहे. मुंबईच्या भर पावसात सिग्नलवर फुलं विकणारी ही मायलेकींची जोडी अनुपम यांना (anupam kher instagram video) भेटली असून सध्या त्यांच्यासोबत काढलेला एक व्हिडिओ खूप viral होत आहे. यामध्ये एक महिला अनुपम यांना फूल देऊन फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. या महिलेचं नाव सुनीता असं असून सोनल ही तिची चिमुकली लेक सुद्धा तिच्यासह फुलं विकताना दिसत आहे. यामध्ये सोनल आणि अनुपम यांच्यात इंग्रजीतून एक संवाद होताना दिसत आहे. आणि अनुपम यांच्या प्रश्नांना सोनल अगदी निरागसपणे उत्तर देत आहे. पावसात अनुप यांना भेटलेली ही फॅन्सची जोडी त्यांना फारच आवडल्याचं दिसत आहे. आपल्या इन्स्टाग्रामवर विडिओ शेअर करत त्यांनी या दोघींचं खूप कौतुक केलं आहे. **हे ही वाचा-** Kalki Koechlin: शूटिंगच्या आधी ब्रेस्ट पंप लावून तयार व्हायची अभिनेत्री; थ्रोबॅक फोटो होतोय VIRAL कॅप्शनमध्ये ते लिहितात, “मुंबईच्या ट्रॅफिक सिग्नलवर फुलं विकणारी ही आई-मुलीची जोडी फारच छान आहे. त्यांनी माझं मन अगदी जिंकून घेतलं आहे. सुनीता आणि सोनल यांचं हसू माझं दिवसभराचं टेन्शन गायब करायला पुरेसं आहे. देव त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य देवो. त्यांची सगळी स्वप्नं पूर्ण होवो अशी इच्छा. थँक यु.”
अनुपम यांनी शेअर केलेले अनेक व्हिडिओ सध्या viral होत आहेत. त्यांनी नुकताच एका व्यक्तीचा व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये जितू नामक व्यक्ती हातात तिरंगा घेऊन धावताना दिसत होता. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘आझादी का अमृत महोत्सव’ आणि ‘हर घर तिरंगा’ नावाची मोहीम राबवायला सुरुवात केली आहे.
ज्याच्या अंतर्गत अनेकजण आपले डीपी आणि फोटोसुद्धा चेंज करत तिरंग्याचा फोटो ठेवताना दिसत आहेत. त्यातच एक व्यक्ती हातात भारताचा झेंडा घेऊन धावताना दिसत असल्याचा हा व्हिडिओ अनेक भारतीयांचं मन जिंकत आहे.