S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :असं केलं जातं हेलिकॉप्टरमधून वृक्षारोपण
  • VIDEO :असं केलं जातं हेलिकॉप्टरमधून वृक्षारोपण

    Ajay Kautikwar | Published On: Jul 5, 2018 05:45 PM IST | Updated On: Jul 5, 2018 05:50 PM IST

    औरंगाबाद,ता.5 जुलै: पावसाळा सुरू झाला की वेध लागतात वृक्षारोपणाचे. पण औरंगाबादमध्ये वृक्षारोपणाचा एक अनोखा उपक्रम राबवण्यात येतोय हा उपक्रम आहे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्याचा. त्यालाच सीड बॉम्बिंग असंही म्हणतात. विविध बियांचे गोळे हेलिकॉप्टरमधून डोंगरावर टाकले जातात. सरकार विविध स्वयंसेवी संस्थांनच्या मदतीनं हा उपक्रम राबवत आहे. सीताफळ, करंज, कडूनिंब अशा प्रकारच्या विविध देशी झाडांच्या बिया मातीच्या गोळ्यात टाकल्या जातात. बोडक डोंगर आणि दऱ्या खोऱ्यांमध्ये हे गोळे टाकले जातात. ज्या ठिकाणी जावून वृक्षारोपण करणं शक्य नाही अशी ठिकाणं यासाठी निवडण्यात येतात.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close