मुंबई, 05 जुलै : ट्विटरवर काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदींच्या 10 वर्षाच्या मुलीला धमकी देणाऱ्याला पोलिसांनी पकडलंय. मुंबई पोलिसांनी आरोपीला अहमदाबाद इथे जाऊन पकडलं. दिल्ली पोलीस आणि मुंबई पोलीस मिळून ही मोहीम यशस्वी केलीय.
सोमवारी काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांना ट्विटरवरून त्यांच्या 10 वर्षांच्या मुलीच्या बलात्कारी धमकी देण्यात आली होती. काही दिवसांआधी मध्य प्रदेशच्या मंदसोरमध्ये 8 वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण आणि नंतर बलात्कार केल्याची घटना घडली होती, त्यासंदर्भात प्रियांका चतुर्वेदी यांना त्यांच्या मुलीच्या बलात्काराची धमकी देण्यात आली होती.
मुंबई पोलिसांनी ट्वीट करणारा आरोपी गिरीश महेश्वरीला अहमदाबाद इथून पकडलं. पोलीस त्याची चौकशी करतायत. शुक्रवारी त्याला कोर्टात हजर केलं जाईल. हा गिरीश अजमेरमध्ये राहतो.
प्रियांका चतुर्वेदी यांनी मुंबईमध्ये गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात काँग्रेसच्या इतर नेत्यांनी प्रियांका चतुर्वेदी यांना पाठिंबा दर्शवला . त्यांच्या म्हणण्यानुसार 'हे तेच लोक आहेत ज्यांनी सुषमा स्वराज यांना ट्रोल केलं. भाजपच्या काही राक्षसांकडून असे प्रकार केले जात आहेत' असं काँग्रेस नेते अभिषेक सिंघवी यांनी म्हटलं होतं.
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.