शिर्डी, ता.5 जुलै: देशातलं श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डीच्या साईमंदिराच्या दानपेटीत भक्तांनी या वर्षी भरभरून दान दिलंय. साईबाबांना 2017-2018 या आर्थिक वर्षात तब्बल 350 कोटींचं दान मिळाल्याची माहिती मंदिर प्रशासनानं दिली आहे. मागच्या वर्षीपेक्षा हे दान 100 कोटींनी जास्त आहे. मागच्या वर्षी 250 कोटी दानपेटीत जमा झाले होते. संस्थानची आर्थिक उलाढाल 550 कोटींची आहे. यातून संस्था अनेक समाज उपयोगी कामही करत असते. संस्थेकडे सध्या 2 हजार 90 कोटींच्या ठेवी, 470 किलो सोनं आणि साडे सहा हजार किलो चांदी जमा आहेत.
VIDEO :असं केलं जातं हेलिकॉप्टरमधून वृक्षारोपण
VIDEO : शुक्रवारपासून महाराष्ट्रात मुसळधार!
शिर्डीत दरवर्षी जगभरातून लाखो भाविक येत असतात. हे भाविक बाबांच्या चरणी कोट्यवधींचं दान देतात. दानपेटीत डॉलरसह जगभरातल्या चलनांचाही समावेश असतो. सोन्या चांदिचे मुकूट, हिरे, माणिक,पाचू अशा मौल्यमान वस्तुंचं हे दान असतं. सोन्या-चांदीचे मुकूट, हार, इतर दागिने, पुजेच्या वस्तु, ताट, अभिषेकाची भांडी, निरंजन, फुलदानी, पुजेचा करंडा अशा असंख्य वस्तु शिर्डी संस्थानच्या खजिन्यात जमा आहेत.
आंध्रप्रदेश आणि तेलंगणामधून शिर्डीला येणाऱ्या भाविकांची संख्याही प्रचंड असून मुक्तहस्तानं ते दान देत असतात. अनेक भक्त आपल्या व्यवसायातला ठराविक हिस्सा दरवर्षी दानही देत असतात. आर्थिक वर्ष संपताना दानपेटीमध्ये जमा झालेले पैसे आणि दानात मिळालेल्या संपत्तीची मोजदाद करून त्याचा ताळेबंद सादर केला जातो.
VIDEO : मुख्यमंत्र्यांनी केली 'भन्नाट' मागणी,विरोधकही बुचकळ्यात पडले
शिर्डीत भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. गुरूपोर्णिमा,रामनवमी, गुढीपाडवा अशा सणांना तर गर्दीचा उच्चांक असतो याच काळात सर्वात जास्त दान जमा होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.