भाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन

भाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन

भारतीय जनता पक्षाचे (BJP) नवनियुक्त राष्ट्रीय सरचिटणीस अनुपम हाजरा यांनी वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे.

  • Share this:

कोलकाता, 27 सप्टेंबर: भारतीय जनता पक्षाचे (BJP) नवनियुक्त राष्ट्रीय सरचिटणीस अनुपम हाजरा यांनी वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. आपल्या कोरोनाची लागण झाली तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन, असं वक्तव्य अनुपम हाजरा यांनी केलं आहे.

हेही वाचा...या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत अनुपम हाजरा यांना पहिल्यांदा संधी मिळाली आहे. मात्र, राष्ट्रीय सरचिटणीस झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनुपम हाजरा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालमधील 24 परगणा जिल्ह्यात बरुईपूर येथो भाजप कार्यकर्त्यांशी झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांना संबोधित करताना अनुपम हाजरा यांनी मुख्यमंत्री ममतांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं.

बरुईपूर येथे भाजपच्या बैठकील कार्यकर्त्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आश्चर्याची बाब म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना यावेळी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला होता. भाजप कार्यकर्त्यांनी मास्कही लावले नव्हते. भाजप कार्यकर्त्यांनी नाक आणि तोंडावर मास्क का लावला नाही, असा प्रश्न पत्रकारांनी अनुपम हाजरा यांना केला होती. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय सरचिटणीस अनुपम हाजरा म्हणाले की, आमचे कार्यकर्ते कोविड-19 पेक्षा अधिक मोठ्या संकटाशी लढत आहेत. ते संकट म्हणजे ममता बॅनर्जी. आणि या संकटाशी भाजप कार्यकर्ते लढत आहेत. अद्याप कार्यकर्त्यांनी कोरोनाची बाधा झाली नाही. त्यामुळे त्यांना कोणाचीही भीती नाही. मात्र, जर आपल्याला कोरोनाची लागण झाली तर आधी ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन.

हेही वाचा...ही काय भानगड बुवा! लग्नाचा VIDEO व्हायरल; नवरदेवाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ममता बॅनर्जी यांनी कोरोना पीडितांसोबत कायम दुजाभाव केला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांचे मृतदेह केरोसीन टाकून जाळण्यात आले, अशा आरोप अनुपम हाजरा यांनी यावेळी केला. अशी वागणूक तर आपण कुत्रे आणि माजरांनीही देत नाही असंही हाजरा यावेळी म्हणाले.

Published by: Sandip Parolekar
First published: September 27, 2020, 10:13 PM IST
Tags:

ताज्या बातम्या