ओम प्रकाश/रांची, 27 सप्टेंबर : लग्नाचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला म्हणून नवरदेवाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या हे वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. सोशल मीडियावर असे कित्येक लग्नाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. मग लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला म्हणून नवरदेवाला शिक्षा का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
ही घटना आहे रांचीमधील (Ranchi). इम्तियाज असं या नवरदेवाचं नाव आहे. इम्तियाजच्या लग्नाच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आता या व्हिडीओत नेमकं असं काय होतं, की पोलिसांनी नवरदेवाविरोधात कारवाई केली, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो.
व्हायरल झालेल्या या लग्नाच्या व्हिडीओत तसं आक्षेपार्ह काही नव्हतं, पण हा व्हिडीओ नवरदेवाच्या तिसऱ्या लग्नाचा व्हिडीओ होता. त्याची पहिली पत्नी असताना तो तिसरं लग्न करत होता. कुणीतरी या लग्नाचा व्हिडीओ शूट केला आणि तो त्याच्या पहिल्या पत्नीपर्यंत पोहोचला. व्हिडीओ पाहून पत्नीचा संताप झाला आणि तिनं आपल्या कुटुंबासह थेट पोलीस स्टेशन गाठलं. भारतात तिहेरी तलाकवर बंदी घालण्यात आली आहे. अशात इम्तियाजने आपली पहिली पत्नी असताना आणखी दोन लग्न केले. याबाबत पहिल्या पत्नीने तक्रार केली.
हे वाचा - ...अन् कुत्र्याने वाचवला माशाचा जीव; विश्वास बसत नाही तर मग पाहा VIDEO
रांची पोलीस ठाण्यात इम्तियाजविरोधात 498 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात याआधी बिहारच्या पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी दाखल आहेत. आता तिसऱ्या लग्नाचाही आरोपही त्याच्यावर करण्यात आला आहे. त्याबाबत तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.