Home /News /coronavirus-latest-news /

मोठा खुलासा! 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर

मोठा खुलासा! 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना, ट्रॅव्हल हिस्ट्री आली समोर

शहरात सध्या 952 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 492 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

शहरात सध्या 952 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 492 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

जानेवारी ते एप्रिल दरम्यान संक्रमित रूग्णांच्या ट्रॅव्हल हिस्ट्रीचा अभ्यास केल्यानंतर संस्थेने ही माहिती समोर आली आहे.

    नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : देशातील कोरोनाबाधितांची संख्या 60 लाख पार झाली आहे. दरम्यान भारतात दुबई आणि यूके येथून आलेल्या लोकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे समोर आले आले. हा दावा भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मंडीने आपल्या रिपोर्टमध्ये केला आहे. जानेवारी ते एप्रिल दरम्यान संक्रमित रूग्णांच्या ट्रॅव्हल हिस्ट्रीचा अभ्यास केल्यानंतर संस्थेने ही माहिती समोर आली आहे. दरम्यान, देशात कोरोनाचा प्रसार वाढला तेव्हा दुबईहून 144 आणि ब्रिटनमधील 64 लोक सुरुवातीच्या काळात भारतात परतले. त्यामुळे हे लोक देशातील संसर्गाचे प्राथमिक स्त्रोत बनले. आयआयटी, मंडीच्या सहाय्यक प्राध्यापक सरिता आझाद यांनी त्यांची विद्यार्थिनी सुषमा देवी यांच्यासमवेत हे संशोधन केले आहे. वाचा-खूशखबर! कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा हे जर्नल ऑफ ट्रॅव्हल मेडिसिनमध्ये प्रकाशित केले आहे. यात संशोधकांना जागतिक स्तरावरून राष्ट्रीय स्तरावर रोगाचा प्रसार होण्याचे कारण दिसून आले आहे. यात काही सुपर स्प्रेडर्स म्हणजे मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रसार करणाऱ्यांची ओळख पटविली आहे. वाचा-अरे देवा! आपला रुग्ण समजून नेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह आणि... या तीन राज्यात कोरोना रुग्ण जात, मात्र संक्रमण कमी आझाद यांच्या मते, पहिल्या टप्प्यात पसरलेला संसर्ग ट्रॅव्हल हिस्ट्रीच्या आधारे आढळला. स्थानिक संक्रमणामुळे बहुतेक लोकांना संसर्ग झाल्याचे दिसून आले. 25 मार्च ते 14 एप्रिल दरम्यान तामिळनाडू, दिल्ली आणि आंध्र प्रदेशात सर्वाधिक संसर्ग झाला. मात्र तेथे संक्रमण कमी झाले. त्याचवेळी गुजरात, महाराष्ट्र, केरळ, जम्मू-काश्मीर आणि कर्नाटकमध्येही संसर्गाचे प्रमाण जास्त होते. वाचा-खळबळजनक! हजारो सरकारी कामगारांना दिली कोरोनाची असुरक्षित लस 24 तासांत 88 हजार 600 नवीन रुग्ण केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार 24 तासांत 88 हजार 600 नवीन लोकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर 1 हजार 124 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांचा आतापर्यंचा आकडा 59 लाख 92 हजार 533 वर पोहोचला आहे. भारतात सध्या 9 लाख 56 हजार 402 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 49 लाख 41 हजार 628 लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशात 94 हजार 503 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका ब्राझिलच्या तुलनेत भारतात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक वाढत आहेत. अमेरिका पहिल्या तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india

    पुढील बातम्या