मुंबई, 25 जून : राज्यात सुरू असलेल्या आयुक्तांच्या बदल्यांमध्ये गौडबंगाल आहे. मुख्य सचिवांच्या खांद्यावर बंदूक ठेवून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे येथे पंख छाटण्याचे प्रकार सुरू आहेत, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. प्रवीण दरेकर यांनी आज ठाणे महापालिका क्षेत्रातील कोरोना संदर्भात केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला, यावेळी त्यांनी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ‘कोरोनाच्या परिस्थिती आयुक्त बदली करणे हा उपाय नाही. शिपायांच्या देखील बदल्या अशा पद्धतीने करण्यात येत नाहीत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आयुक्त आणले होते. पण आता परत एकदा बदली करण्यात आली आहे. ज्या पद्धतीने सध्या राज्य सरकार वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करत आहेत. या बदल्याच्या आड मुख्य सचिवांच्या खांद्यावर बंदूक ठेवून एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्याचे काम तर होत नाही ना’, असा संशय दरेकर यांनी व्यक्त केला. जितेंद्र आव्हाडांनी अक्षय कुमारला फटकारलं; म्हणाले, तू न्यूजपेपर वाचत नाहीस का? ‘ठाणे महानगरपालिकेने मोठं मोठे कोविड सेंटर डेकोरेशन सहित उभे केले आहे. मात्र, परिचारिका नाहीत मनुष्यबळ नाही. एवढ्या व्यवस्था उभ्या करुन काय फायदा? असा सवालही प्रवीण दरेकरांनी उपस्थित केला. ठाण्यात वेळेवर उपचार मिळत नाही म्हणून किंवा रुग्णवाहिका मिळत नाहीत म्हणून लोकांचे मृत्यू होत आहे. या मृत्यूंना नैसर्गिक मृत्यू कसे बोलणार, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हे मृत्यू झाले आहेत, अशी टीकाही दरेकरांनी केली. संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.