Home /News /maharashtra /

जितेंद्र आव्हाड यांनी अक्षय कुमारला फटकारलं; म्हणाले, तू न्यूजपेपर वाचत नाहीस का?

जितेंद्र आव्हाड यांनी अक्षय कुमारला फटकारलं; म्हणाले, तू न्यूजपेपर वाचत नाहीस का?

जितेंद्र आव्हाड यांनी इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून बाबत बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता अक्षयकुमार याला चांगलंच फटकारलं आहे.

    मुंबई, 25 जून: राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जितेंद्र आव्हाड यांनी इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून बाबत बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता अक्षयकुमार याला चांगलंच फटकारलं आहे. 'अक्षय, तू ट्विटरवर सक्रिय नाहीस का?... तू कार वापरणं बंद केलंस का?... तू वर्तमानपत्र वाचत नाहीस का?... तुझ्या माहितीसाठी सांगतो की देशात पेट्रोल, डिझेलच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत,' असं आव्हाड यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. हेही वाचा...रामदेव बाबांना ठाकरे सरकारचा झटका, 'कोरोनिल'बद्दल घेतला मोठा निर्णय दरम्यान, अक्षय कुमार यानं यूपीए सरकारच्या काळात 9 वर्षांपूर्वी म्हणजेच 16 मे 2011 रोजी इंधनाच्या महागाईवरून खोचक ट्वीट केलं होतं. यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्याच मुद्द्यावरून आता अक्षयकुमार याला टार्गेट केलं आहे. काय म्हणाला होता अक्षयकुमार? 'मी रात्री माझ्या घरीसुद्धा जाऊ शकलो नाही, कारण इंधनाच्या किमती पुन्हा रॉकेटप्रमाणे वाढण्याआधी संपूर्ण मुंबई पेट्रोलसाठी रांगा लावत होती.' असे ट्वीट अक्षयकुमारने 16 मे 2011 रोजी केले होते. अक्षयच्या याच ट्वीटला शोधून काढत जितेंद्र आव्हाड यांनी 'कोट-रीट्वीट' केलं आहे. आता जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला अक्षयकुमार काय प्रत्युत्तर देतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विसरला असाल तर लक्षात आणुन द्यावे म्हंटल pic.twitter.com/n6573ZS0n3 — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 24, 2020 दरम्यान, कोरोनामुळे देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सरकारला मोठा तोटा सहन करावा लागत आहे.  गेल्या काही दिवसांतील महसुली तोटा भरून काढण्यासाठी इंधन कंपन्यांची धडपड सुरू आहे. परिणामी पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. सलग 19 व्या दिवशी दरवाढीचा हा धडाका उडाला आहे.
    First published:

    Tags: Akshay Kumar, Fuel rate, Jitendra awhad

    पुढील बातम्या