S M L

सिंचन घोटाळा तपासात दिरंगाई का?  हायकोर्टाने सरकारला फटकारले

Updated On: Jul 19, 2018 03:41 PM IST

सिंचन घोटाळा तपासात दिरंगाई का?  हायकोर्टाने सरकारला फटकारले

नागपूर, ता. 19 जुलै : राज्यातील 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा तपासा करण्यात एसीबीने का दिरंगाई केली? आणि या घोटाळ्यात गुतलेल्या राजकीय नेत्यांच्या चौकशी संदर्भात केलेल्या हलगर्जीपणा यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत.

सिंचन घोटाळ्याचा विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत तपास सुरू असून, एकूणच तपासाबाबत न्यायालयाने असमाधान व्यक्त केले होते. याप्रकरणी तपास करत असेलेली एसआयटी नेमकी काय करत आहे, अशी विचारणा करित खंडपीठाने तपासावर प्रश्नचिन्ही उपस्थित केलं होतं. तर सिंचन प्रकल्पाच्या सद्यस्थितीची आठवड्याभरात माहिती सादर करण्याचे निर्देशही पाटबंधारे महामंडळला देण्यात आले होते. तसोच एसीबीच्या महासंचालकांनी आत्तापर्यंतची प्रगती कोर्टाला रेकॉर्डवर सांगावी असे आदेशही देण्यात आले होते. तसेच सिंचन घोटाळ्याचा तपास करीत असलेल्या एसआयटीच्या दैनंदिन कामावर लक्ष ठेवण्यासाठी दोन सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या समितीसाठी आरती चव्हाण व जे. एन. पटेल यांची नावे गुरुवारी हायकोर्टाला सुचविण्यात आली होती.

अविश्वास प्रस्तावावर शिवसेनेने घेतला हा मोठा निर्णय

दरम्यान तपासाचा विस्तृत अहवाल घेण्यासाठी सरकारने पोलीस उपमहासंचालक यांच्याकडून हायकोर्टाला दोन आठवड्याचा वेळ मागितला होता. हायकोर्टाने सरकारची चशी विनंती मान्य केली होती. परिणामी या प्रकरणात दोन आठवड्यानंतर काय घडामोडी घडतात, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली होती. सिंचन घोटाळ्यात समाधानकारक कारवाई झाली नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली असून, सिंचन घोटाळ्याच्या सुनावणी साठी विशेष  कोर्ट स्थापन करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. तसेच  सिंचन घोटाळ्यासंदर्भात दररोज सुनावणी व्हावी, असे हायकोर्टाने म्हटले आहे.

हेही वाचा...

Loading...
Loading...

ईव्हीएमच्या जोरावर भाजप निवडणुका जिंकतं, राज ठाकरेंचा आरोप

आयकर विभागाच्या छाप्यात हाती लागलं 100 किलो सोनं, समोर आले PHOTOS

GOOD NEWS : शेतीच्या 'या' योजनांसाठी 1 लाख 55 हजार कोटीचं पॅकेज जाहीर

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 19, 2018 03:41 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close