मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्याची अनलॉकच्या दिशेने वाटचाल; महापौरांनी जाहीर केले नवे नियम, पाहा काय सुरू आणि काय बंद?

पुण्याची अनलॉकच्या दिशेने वाटचाल; महापौरांनी जाहीर केले नवे नियम, पाहा काय सुरू आणि काय बंद?

आज पुण्याच्या महापौरांनी पत्रकार परिषद घेऊन बदललेल्या नियमावलीबाबत सांगितले.

आज पुण्याच्या महापौरांनी पत्रकार परिषद घेऊन बदललेल्या नियमावलीबाबत सांगितले.

आज पुण्याच्या महापौरांनी पत्रकार परिषद घेऊन बदललेल्या नियमावलीबाबत सांगितले.

पुणे, 31 मे : पुण्यात गेल्या दोन महिन्यांपासून कठोर निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यानंतर आज गेल्या 24 तासात अवघे 180 रुग्ण समोर आले आहेत. दुसऱ्या लाटेतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. दरम्यान पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम म्हणूनच रूग्णसंख्या कमी झाली अशी भावना पुण्याच्या महापौरांनी व्यक्त केली आहे. काल पुण्यात गेल्या तीन (Pune Corona Update) महिन्यातील सर्वात कमी रुग्णसंख्या नोंदविण्यात आली होती. दुसऱ्याच दिवशी पुण्यातून आणखी एक चांगली बातमी समोर आली आहे. गेल्या 24 तासात पुण्यातून अवघे 180 रुग्ण पॉझिटिव्ह (Covid - 19) आले आहे. आज दिवसभरात पुण्यात 4439 चाचण्या करण्यात आल्या. त्यातून केवळ 180 जणांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. हे ही वाचा-VIDEO: Hot Spot पुणे जिल्ह्यातली काही कोरोनामुक्त, कसं साधलं हे? काय आहे नवी नियमावली- -पुणे शहरातील लॉकडाऊनला 60 दिवस झाले असून कोरोनाही आटोक्यात आला आहे. आता पुन्हा अनलॉकच्या दिशेने जात आहे. -पुण्यात सकाळी 7 ते 2 पर्यंत सर्वप्रकारची दुकाने सोमवार ते शुक्रवार सुरू राहणार आहेत. -शनिवार, रविवारी माञ फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहिल -उद्याने, हॉटेल बंद राहणार, फक्त पार्सल सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहिल -पण तरीही यापुढे नियम पाळावेच लागतील -पुढच्या दिवसांसाठी ही शिथिलता असेल, नंतर पुन्हा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल -शासकीय कार्यालये 25 टक्के उपस्थितीत सुरू राहणार -मद्यविक्रीची दुकाने सातही दिवस सुरू राहणार -शॉपिंग कॉम्पलेक्स बंदच राहणार -पुण्यातील पावसाळी पूर्व कामं सुरूच आहेत, वेळेत लवकर पूर्ण करू -लग्न, समारंभ, मेळावे बंदच असतील
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Corona patient, Pune

पुढील बातम्या