जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Corona Update: पुणेकरांसाठी Good News! गेल्या 24 तासांत दुसऱ्या लाटेतील सर्वात कमी रुग्णसंख्या

Corona Update: पुणेकरांसाठी Good News! गेल्या 24 तासांत दुसऱ्या लाटेतील सर्वात कमी रुग्णसंख्या

पुण्यात कोरोनाची साथ नियंत्रणात मात्र शेजारील जिल्ह्याने वाढवली चिंता (प्रातिनिधिक फोटो)

पुण्यात कोरोनाची साथ नियंत्रणात मात्र शेजारील जिल्ह्याने वाढवली चिंता (प्रातिनिधिक फोटो)

गेल्या 24 तासात आलेल्या रुग्णसंख्येच्या कितीतरी पटीने अधिक बरे होऊन घरी जाणाऱ्यांचं प्रमाण आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 31 मे: काल पुण्यात गेल्या तीन (Pune Corona Update) महिन्यातील सर्वात कमी रुग्णसंख्या नोंदविण्यात आली होती. दुसऱ्याच दिवशी पुण्यातून आणखी एक चांगली बातमी समोर आली आहे. गेल्या 24 तासात पुण्यातून अवघे 180 रुग्ण पॉझिटिव्ह (Covid - 19) आले आहे. आज दिवसभरात पुण्यात 4439 चाचण्या करण्यात आल्या. त्यातून केवळ 180 जणांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दुसऱीकडे पॉझिटिव्ह रुग्णांच्या चौपटहून अधिक बरे होऊन घरी जाण्याऱ्यांचं प्रमाण आहे. सध्या पुण्यात पावसाचं आगमन झाल्यामुळे वातावरणात गारवा परतला आहे. त्यात गेल्या अनेक दिवसांपासून घोंगावणाऱ्या कोरोनाच्या संकटातूनही पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. गेल्या 6 महिन्यातील निच्चांकी रूग्णवाढ आहे. दुसरीकडे आज पुणे शहरातील 24 बाहेरील अशा 33 जणांचा मृत्यू झाला आहे. (Good News for Punekar The lowest number of patients in the second wave in the last 24 hours)

जाहिरात

दरम्यान पुण्यात पहिल्या ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटर सुरू करण्यात आलं आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. दुसरीकडे कोरोनाचा लहान मुलांवर होणारा धोका लक्षात घेता या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून पुणे शहरासह पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 82 रुग्णालयांमध्ये एकूण 8 हजार 77 बेड्स लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या एकूण खाटांपैकी 7 हजार 939 खाटा साध्या असणार आहेत. त्याचबरोबर यामध्ये 494 आयसीयू बेड्स, 183 व्हेंटिलेटर बेड तर 138 ऑक्सिजन बेड असणार आहेत. हे बेड प्रामुख्याने पुणे शहरासह पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अशाप्रकारे पुणे जिल्हा प्रशासनाने येणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन पूर्वतयारी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात