Home /News /news /

ठाकरे सरकारचे येत्या काही दिवसांत तीन विकेट पडणार, भाजप नेत्यानं केला मोठा दावा

ठाकरे सरकारचे येत्या काही दिवसांत तीन विकेट पडणार, भाजप नेत्यानं केला मोठा दावा

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मुंबई महापौर किशोरी पेडणेकर जेलमध्ये जाणार आहे. तर...

मुंबई, 9 ऑक्टोबर: राज्यातील सत्ताधारी ठाकरे सरकारचे येत्या काही दिवसांत तीन विकेट पडणार आहे, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मुंबई महापौर किशोरी पेडणेकर जेलमध्ये जाणार आहे. तर परिवहन मंत्री अनिल परब देखील म्हाडा जमीन प्रकरणी घरी बसणार आहेत, असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे. हेही वाचा...मराठा आरक्षणासाठी वेळ आल्यास तलवार पण काढेन; संभाजीराजेंचा सरकारला इशारा भाजप प्रवक्ते किरीट सोमय्या यांनी सांगितलं की, अनंत करमुसे मारहाण प्रकरणी त्यांनी ठाणे पोलिस आयुक्तांची भेट घेतली. अनंत करमुसे मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना कधी जेलमध्ये टाकणार असा सवाल केला. त्यांना अटक का होत नाही, असा सवाल सोमय्या यांनी यावेळी केला. आमदार निरंजन डावखरे, भाजप नगरसेवक मनोहर डुंबरें देखील यावेळी उपस्थित होते. दरम्यान, TRP प्रकरणांचा मुंबई पोलिसांनी नुकताच भंडाफोड केला. TRP प्रकरणात ठाकरे सरकार आणि गृहमंत्री अनिल देशमुख त्या चॅनेल वाल्यांना का घाबरत आहे, असा सवाल देखील सोमय्या यांनी केला आहे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही कोविडमध्ये पूर्ण जबाबदारीने काम करत आहे. कोविडमध्ये किती जण मृत्युमुखी पडले आहे. त्यामुळे हे सरकार त्यांच्या पापाने पडणार, असा खोचक टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे.. मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर sra प्रकरणात खोटे बोलत आहे. तर याबाबत आम्ही पुढे जनहित याचिका दाखल करणार आहे, असंही सोमय्या यांनी सांगितलं. हेही वाचा...‘छत्रपतींचा अपमान झालाय, संभाजी भिडेंनी बोललं पाहिजे’, राऊतांनी साधला निशाणा इलेक्ट्रिक बिलबाबत आव्वाच्या सव्वा आले आहे. ठाकरे सरकार उत्तर देऊ शकली नाही. मला विश्वास आहे, आम्हाला न्याय मिळेन, असं किरीट सोमय्या यांनी यावेळी सांगितलं.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Maharashtra, Udhav thackarey

पुढील बातम्या