‘छत्रपतींचा अपमान झालाय, संभाजी भिडेंनी बोललं पाहिजे’, संजय राऊतांनी साधला निशाणा

‘छत्रपतींचा अपमान झालाय, संभाजी भिडेंनी बोललं पाहिजे’, संजय राऊतांनी साधला निशाणा

'या आधी छत्रपतींचा अपमान झाला म्हणून भिडे यांनी आंदोलन छेडले होते. आता त्यांनी बोललं पाहिजे.'

  • Share this:

मुंबई 09 ऑक्टोबर: वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खासदार उदयनराजे आणि खासदार संभाजीराजे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावरून संभाजी भिडे गुरूजी (sambhaji bhide guruji ) यांच्यावर निशाणा साधला आहे. या आधी छत्रपतींचा अपमान झाला म्हणून भिडे यांनी आंदोलन छेडले होते. आता छत्रपतींचा अपमान होत असताना भिडे यांनी बोललं पाहिजे असं राऊत यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी MPSCची परीक्षा घेऊनये अशी भूमिका मांडली होती. परीक्षा घेण्याचा निर्णय झाला तर त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा दिला होता. त्यावरून प्रकाश आंबेडकरांनी जोरदार टीका केली होती. त्यावरून राऊक यांनी भिडे यांना कात्रित पकडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी अशा प्रकारची वक्तव्य करणं हे योग्य नाही असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

मुंबईत बसून काही लोक मुंबई, सरकार,  उद्धव ठाकरे,  शरद पवार,  अनिल देशमुख आणि माझ्यावर गरळ ओकत आहेत. त्यांचा बोलावता धनी कोण आहे हे तपासात कळेलच. मुंबई पोलिसांच्या या कारवाईचं कौतुक होत आहे. या कारवाईबाबत कोणाच्या पोटात दुखत असेल तर त्याचा उपचार आम्ही करू. यातून अनेक गोष्टी बाहेर या येतीलच.

मराठा आरक्षणासाठी वेळ आल्यास तलवार पण काढेल; संभाजीराजेंचा सरकारला इशारा

घोटाळा उघड झाल्यावर अनेक जण गप्प का आहेत. राफेल, 3 जी 2 जीच्या घोटाळ्याप्रमाणे हा घोटाळा आहे.

मराठीसाठी लढण्याचं स्पिरिट बाळासाहेबांनी तयार केलं. आमच्या मनात त्याची धग कायम आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हे डॉक्टर आहेत त्यांनी सत्तासाठी लस शोधली असावी, हे सरकार कायम राहणार हे त्यांना माहीत आहे, महाराष्ट्र सरकार 5 वर्ष टिकणारच. CBI चे संचालक आत्महत्या करतात आणि कोणाला प्रश्न उपस्थित करावासा वाटला नाही.

कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर नवरात्र काळात बंद राहणार, देवस्थान समितीचा मोठा निर्णय

राज ठाकरे यांच्याकडे जरी कोण जात असले तरी बंधन नाही कोणी कोणाकडे जावं.' ग्रंथालायबाबत अनेकांशी चर्चा झाली आहे.ण मुद्दे मार्गी लागत असतील तर चांगलं आहे असंही ते म्हणाले.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 9, 2020, 2:50 PM IST

ताज्या बातम्या