Home /News /maharashtra /

मराठा आरक्षणासाठी वेळ आल्यास तलवार पण काढेन; संभाजीराजेंचा सरकारला इशारा

मराठा आरक्षणासाठी वेळ आल्यास तलवार पण काढेन; संभाजीराजेंचा सरकारला इशारा

माझा पक्ष गेला खड्यात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार...

उस्मानाबाद, 9 ऑक्टोबर: मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी सरकारला जागं करण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापूर येथून सुरूवात झाली. खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार ओमराजे निंबाळकर मोर्चात सहभागी झाले आहे. हेही वाचा...कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर नवरात्र काळात बंद राहणार, देवस्थान समितीचा मोठा निर्णय मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकारचे प्रयत्न कमी पडत असल्याचं दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नाही, असा घणाघाती आरोप संभाजीराजे यांनी यावेळी केला. आम्हला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका, वेळ आल्यास तलवार पण काढेन, असा सज्जड इशारा खासदार संभाजीराजे यांनी सरकारला दिला आहे. आम्ही भिकारी नाही तर हक्क मागत आहोत, अशा शब्दांत त्यांनी ठणकावलं. आम्ही दिल्लीला पण येण्यासाठी घाबणार नाहीत, अशा शब्दांत संभाजी राजे यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारला आव्हान दिलं आहे. माझा पक्ष गेला खड्यात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. राज्यात होणारी मराठा आंदोलनं भाजप पुरस्कृत नाहीत, असंही संभाजीराजेंनी यावेळी स्पष्ट केलं. खासदार संभाजी राजेंच्या भाषणातील ठळक मुद्दे... -मराठा सामाजा चे दुःख कोण सांगणार...केंद्र व राज्य सरकारला काही देणं घेणं नाही -बारा बलुतेदारी टिकली पाहिजे -80 टक्के मराठा समाज गरीब - डॉ.बाबासाहेब आंबेडकर समजले नाहीत, असा माणूस याचिका दाखल करतो दुर्दैवी आहे, वकील गुणरत्ने सदावर्तेवर नाव न घेता टीका -आम्हला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका- सरकारला इशारा -आम्ही भिकारी नाही तर हक्क मागत आहोत -समाजात दोन गट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. -माझा राजवाडा मी 2007 ला सोडला -समाजाला मांडी लावून बसणे हेच माझा राजवाडा -आम्हाला आता गृहीत धरू नका -कोण मुख्यमंत्री, कोण उपमुख्यमंत्री याच्याशी देणं घेणं नाही. -मुख्यमंत्री यांना सांगून आलो आहे समाज तुमच्याकडे मोठ्या आशेने पाहतो आहे. - समाजाला टाकद देण्यासाठी भवानीचा आशीर्वाद घेतला आहे - संयम कधी सोडायचा माहीत आहे, वेळ आली की तलवार पण काढेन - आम्ही दिल्ली ला पण येण्यासाठी घाबणार नाहीत, राज्य सरकार व केंद्र सरकारला आव्हान -माझा पक्ष गेला खड्यात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार -दुसरी फळी तयार करणे गरजेचं वकील कायदेशीररित्या लढणार
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या