Home /News /news /

अजित पवारांना टार्गेट करणारा भाजपचा बडा नेता शिवसेनेच्या संपर्कात? उद्धव ठाकरेंची घेतली भेट

अजित पवारांना टार्गेट करणारा भाजपचा बडा नेता शिवसेनेच्या संपर्कात? उद्धव ठाकरेंची घेतली भेट

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेत प्रवेशासाठी नेते आणि कार्यकर्त्यांची रिघ लागली होती. तेच नेते आता सत्ताधारी पक्षांच्या संपर्कात असल्याचं चित्र बघायला मिळत आहे.

    मुंबई 6 फेब्रुवारी : महाराष्ट्रात सरकार बदललं की वातावरणही बदलतं. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेत प्रवेशासाठी नेते आणि कार्यकर्त्यांची रिघ लागली होती. तेच नेते आता सत्ताधारी पक्षांच्या संपर्कात असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीवर आरोप करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. बारामतीचा शेजारी तालुका असलेल्या इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा दबदबा आहे. मात्र स्थानिक राजकारणामुळे पवार आणि पाटील यांच्यात कधी फारसं पटलं नाही. विधान सभेच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार, शरद पवार यांना टार्गेट करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. पाटील हे पुन्हा वेगळा विचार करत असून ते शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. हर्षवर्धन पाटील यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. 2014मध्येही ते जिंकू शकले नव्हते. त्यामुळे यावेळी त्यांनी पूर्ण ताकद लावली होती. मात्र ते जिंकू शकले नाहीत. पवारांनीच आपल्या पराभवासाठी प्रयत्न केल्याचं पाटील यांनी म्हटलं होतं. त्यातच इंदापूर हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आला होता. इंदापूर काँग्रेसला मिळावा अशी मागणीही काँग्रेसने राष्ट्रवादीकडे केली होती मात्र शेवटपर्यंत ते काही मान्य झालं नाही. मुंबई महापालिकेत नोकर भरतीच्या मुद्दा पेटणार, आयुक्तांची नवी खेळी त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र राज्यात परिस्थिती बदलल्याने वेगळं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेऊन चर्चा केली. तब्बल तासभर ही भेट चालल्याचं बोललं जातंय. भिवंडीत सह दुय्यम निबंधक कार्यालयात 27 लाखांचा अपहार ; 3 जणांना अटक त्यामुळे पाटील हे कमळ सोडून शिवबंधन बांधणार का अशी चर्चा सुरू झालीय. मात्र हर्षवर्धन पाटील यांनी अशी शक्यता फेटाळून लावलीय. साखर उद्योगातल्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं स्पष्टकरण त्यांनी दिलंय.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Ajit pawar, Harshawardhan patil

    पुढील बातम्या