Home /News /maharashtra /

भिवंडीत सह दुय्यम निबंधक कार्यालयात 27 लाखांचा अपहार ; 3 जणांना अटक

भिवंडीत सह दुय्यम निबंधक कार्यालयात 27 लाखांचा अपहार ; 3 जणांना अटक

या अपहारप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणात तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

    रवी शिंदे, भिवंडी, 5 फेब्रुवारी : भिवंडीतील सहदुय्यम निबंधक कार्यालय क्र. 3 मध्ये चलन भरल्याच्या बनावट पावत्यांद्वारे तब्बल 27 लाख 11 हजार 400 रुपयांचा अपहार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या अपहारप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणात तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. भिवंडीतील सहदुय्यम निबंधक कार्यालय क्र. 3 मध्ये बांधकाम व्यावसायिकाचा एजेंट आणि कार्यालयात तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या संगणक चालकाने 11 लाख 74 हजार 400 रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झालं. त्यानंतर कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक दिलीप आव्हाड यांनी अपहारप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात श्रवणकुमार सहदेव गजम ( वय 33 रा पद्मानगर ) आणि कार्यालयातील तात्पुरता संगणक ऑपरेटर नागेश शिवाजी क्यातमवार ( वय 28 ) या दोघांविरोधात तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्याचा सखोल तपस करत असताना नारपोली पोलिसांनी सहदुय्यम निबंधक कार्यालयातील दत्त तपासले असता यामध्ये सुमारे 15 दस्तामध्ये अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसंच सुमारे 27 लाख 11 हजार 400 रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. या अपहार प्रकरणात सहदुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 3 मधील कर्मचारीदेखील सहभागी असल्याची शक्यता पोलोसांनी वर्तविली आहे. हिंगणघाट जळीतकाडांनंतर औरंगाबादही हादरलं, घरात घुसून बिअर बार चालकानं महिलेला जिवंत पेटवलं फिर्याद नोंदविणारे वरिष्ठ लिपिक दिलीप आव्हाड यांचादेखील सहभाग असून त्यांच्यासह या कार्यालयातील लिपिक अरुण कंखर , महिला लिपिक एल एस सांगळे , संगणक ऑपरेटर दिपक शिंदे यांच्या विरोधातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचे कर्मचारी फरार झाले आहेत . तर श्रवणकुमार सहदेव गजम, नागेश क्यातमवार , व दिपक शिंदे या तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता 10 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे, अशी माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी दिली आहे. 
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Bhiwandi

    पुढील बातम्या