जळगाव, 11 जुलै: कोरोनामुळे जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात चोरांचा सुळसुळाट झाला आहे. या काळात जिल्ह्यात अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत. मोटारसायकल चोरीच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जळगाव ग्रामीण पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. चाळीसगाव, धुळे, मालेगाव येथून दुचाकी चोरणाऱ्या तीन चोरट्यांच्या मुसक्या आवळत पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 24 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. हेही वाचा… नाल्यांवर इमारती! अधिकारी आणि बिल्डरांच्या अभद्र युतीने नाशिकरांचा जीव धोक्यात चाळीसगाव, मालेगाव, धुळे व इतर ठिकाणाहुन मोटारसायकल चोरुन त्या विक्री करणार्या तीन अट्टल मोटारसायकली चोरट्यांना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी विवेक शिवाजी महाले (रा.बहाळ) याच्याकडून 8 मोटारसायकली, दुसरा आरोपी ईश्वर शिवलाल भोई (रा.बहाळ) याच्याकडून 7 मोटारसायकली, तर तिसरा आरोपी आकाश ज्ञानेश्वर महाले याच्याकडून 9 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. 24 मोटारसायकलची किंमत 11 लाख 40 हजार रुपये आहे. हेही वाचा… पुण्यात ‘मुळशी पॅटर्न’चा थरार, घरात घुसून कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी अत्यंत सावधगिरी बाळगून ही यशस्वी कामगिरी केली आहे. यामुळे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे व त्यांच्या पथकाची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे. अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. चोरट्यांकडून अनेक गुन्हे समोर येण्याची शक्यता असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







