जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / नाल्यांवर इमारती! अधिकारी आणि बिल्डरांच्या अभद्र युतीने नाशिकरांचा जीव धोक्यात

नाल्यांवर इमारती! अधिकारी आणि बिल्डरांच्या अभद्र युतीने नाशिकरांचा जीव धोक्यात

नाल्यांवर इमारती! अधिकारी आणि बिल्डरांच्या अभद्र युतीने नाशिकरांचा जीव धोक्यात

नाशिक शहरात नैसर्गिक नाले बुजवून त्यावर बहुमजली इमारती उभ्या केल्या जात आहेत. महानगरपालिकेतील अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिकांच्या आर्थिक हित संबधातून हा गोरखधंदा सुरू आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लक्ष्मण घाटोळ, (प्रतिनिधी) नाशिक, 11 जुलै: नाशिक शहरात नैसर्गिक नाले बुजवून त्यावर बहुमजली इमारती उभ्या केल्या जात आहेत. महानगरपालिकेतील अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिकांच्या आर्थिक हित संबधातून हा गोरखधंदा सुरू आहे. मात्र, अधिकारी आणि बिल्डरांच्या अभद्र युतीने नाशिकरांचा जीव धोक्यात आला आहे. नाशिक शहरातील नैसर्गिक नाल्यांवर बांधकाम व्यावसायिक इमारती उभ्या करत आहे. हे चित्र नाशिक शहराच्या एका भागात नसून प्रत्येक भागात असं विदारक चित्र पाहायला मिळत आहे. नाशिक शहरात जमिनींचे भाव गगनाला भिडले आहे. मात्र, नैसर्गिक नाल्या लगतच्या जागा मूळ मालक त्या जागा कमी भावाने विकत असल्याने बांधकाम व्यावसायिकांनी त्याच संधीचा फायदा घेतला आहे. हेही वाचा… पुण्यातील इंदापुरात कोरोनाचा पाचवा बळी, आरोग्य केंद्रातील नर्सलाही लागण नाल्या शेजारच्या जमिनी स्वस्त दरात खरेदी करून या जागांवर इमारती उभ्या करत आहेत. या साठी हे बांधकाम व्यावसायिक महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरत आहेत. नैसर्गिक नाल्यांवरही कायद्यातील पळवाटा शोधून बांधकामाच्या परवानग्या मिळवत नाशिकरांच्या जीविताशी खेळत आहे. शहरात 40 मिलीमीटर इतका पाऊस पडला तरी पावसाचं पाणी नागरिकांच्या घरात जातं तर कुठे रस्ते पाण्याखाली जातात. विशेष म्हणजे या भ्रष्ट कारभाराचा फटका सामन्याप्रमाणे शहरातील दोन माजी आमदारांनाही बसला आहे. या प्रकरणी ‘न्यूज 18 लोकमत’ने जाब विचारला असता महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितलं की, शहरातील सर्व नाल्यांचा सर्व्हे करून अशी अनाधिकृत बांधकाम आढळून आल्यास ती पाडण्यात येतील. मात्र ही अनधिकृत बांधकाम उभी राहत असताना पालिका अधिकाऱ्यांनी या बांधकामांना परवानग्या दिल्याच कशा? असाही सवाल समोर आला आहे. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी या प्रकरणी कारवाई देखील सुरू केली होती. मात्र, तुकाराम मुंडेंची बदली होताच या बेकायदेशीर कामांनी शहरात पुन्हा उच्छाद मांडला आहे. हेही वाचा… फारशा वैद्यकीय सुविधा नसलेल्या हिंगोलीनं करून दाखवलं, रिकव्हरी रेट 90 टक्के दरम्यान, नाशिक शहरात जवळपास 22 मोठे आणि 100 हून अधिक छोटे नसर्गिक नाले आहेत. मात्र, यातील अनेक नाल्यांवर अतिक्रमण करत प्लॉटची जागा वाढवण्याचा प्रताप बिल्डरांनी केला आहेय. सध्या पावसाळा सुरू आहे. नाशिक शहरात एकाच वेळी 150 मिलिमीटर पाऊस झाल्यास निमं शहर पाण्याखाली जाऊ शकतं. त्यामुळे या प्रकाराला वेळीच आवर घालणं गरजेचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: nashik
  • First Published :
जाहिरात
जाहिरात