नरेंद्र मते, प्रतिनिधी
वर्धा, 28 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. दारूच्या वादातूनही अनेक गुन्हेगारीच्या घटना घडत उघडकीस येत आहेत. त्यातच आता वर्धा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्धा जिल्हा दारुबंदी जिल्हा असतानाही मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने दारूची विक्री केली जाते. जिल्हा पोलीस अधीक्षक नूरूल हसन यांनी अवैध व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. वर्ध्यात घरीच एकाने बारचा सेट अप तयार करुन ठेवला होता. तसेच दारू लपविण्यासाठी आढळून विहिरीसारखी सुरुंगही त्याने बनवली होती. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असली तरी दारुविक्रेते नवनव्या क्लुप्त्या दारू लपवण्यासाठी वापरतात. पोलिसांनी केलेल्या कारवाईत घरातच चक्क बारप्रमाणे सेटअप लावल्याच आढळून आलंय. घरात विहिरीसारखी 20 फुट लांबीची सुरंगही आढळून आली आहे. ही सुरुंग दारू लपवून ठेवण्यासाठी वापरली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
वर्ध्यातील पोद्दार बगिचा परिसरात पोलिसांच्या क्राईम इंटेलिजन्स पथकानं छापा घातला. यावेळी सराईत दारू विक्रेत्याच्या घराची तपासणी केली असता तीन ते चार खोल्यांमध्ये बारप्रमाणे सेट अप आढळला. घरात सुरुंगाप्रमाणे विहीरही आढळली. दारूसाठा लपवण्यासाठी या सुरंगाचा वापर केला जात असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. या कारवाईत पोलिसांनी एक लाख रुपयांवर मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान आणखी एका घटनेत वर्ध्यात बनावट दारू बनविणाऱ्या कारखान्याची पोलखोल झाली आहे. बनावट दारूच्या शेकडो बॉटल याठिकाणी सापडल्या. बनावट दारू बनविण्याचे रसायन, बनावट सील आणि रिकाम्या बॉटलही याठिकाणी आढळून आल्या आहेत. पोलिसांनी धाड टाकत हा कारखाना पोलिसांनी उद्धवस्त करत लाखोंचा बनावट दारुसाठा जप्त केला.
हेही वाचा - मुलाच्या वयाच्या तरुणासोबत अफेयर, समजावूनही महिलेने ऐकले नाही, पतीने तिचा विषयच संपवला!
वर्ध्यातील सावंगीच्या एका अपार्टमेंटमध्ये बनावट दारू निर्मितीचा कारखाना सुरू होता. वर्ध्यातील आजची ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे. सकाळच्या सत्रात पोलिसांनी राम नगर येथील पोद्दार बगीच्या परिसरात पहिली कारवाई केली होती. या कारवाईत दारू विक्रेत्याच्या घरात दारू लपवून ठेवण्यासाठीचे भुयार सापडले होते. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या क्राईम इंटेलिजन्स पथकाने ही कारवाई केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Liquor stock, Police, Wardha, Wardha news