मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /मुलाच्या वयाच्या तरुणासोबत अफेयर, समजावूनही महिलेने ऐकले नाही, पतीने तिचा विषयच संपवला!

मुलाच्या वयाच्या तरुणासोबत अफेयर, समजावूनही महिलेने ऐकले नाही, पतीने तिचा विषयच संपवला!

पत्नीच्या अनैतिक संबंधावरुन पतीने तिला अनेकदा समजावले. अखेर त्याने समाजातील बदनामीच्या भीतीने भयानक निर्णय घेतला.

पत्नीच्या अनैतिक संबंधावरुन पतीने तिला अनेकदा समजावले. अखेर त्याने समाजातील बदनामीच्या भीतीने भयानक निर्णय घेतला.

पत्नीच्या अनैतिक संबंधावरुन पतीने तिला अनेकदा समजावले. अखेर त्याने समाजातील बदनामीच्या भीतीने भयानक निर्णय घेतला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India

गोरखपुर, 26 जानेवारी : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनैतिक संबंधातून हत्या, तसेच आत्महत्येच्याही खळबळजनक घटना उघडकीस येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या अनैतिक संबंधांवरून पतीने रागाच्या भरात तिची हत्या केली. इतकेच नाही तर पत्नीच्या हत्येनंतर आरोपी पतीने स्वत: पोलिस ठाणे गाठून पोलिसांसमोर फिर्याद देऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये पती-पत्नी आणि तिची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आरोपीने दिलेल्या कबुलीमध्ये पत्नीच्या अवैध संबंधांचा उल्लेख केला आहे. पत्नीच्या अवैध संबंधांवरुन पती आणि पत्नी दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. मृत महिलेचे तिच्या मुलाच्या वयाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध होते. हा प्रकार कळल्यानंतरही पतीने पत्नीला समजावून सांगून तरुणासोबतचे अवैध संबंध संपवण्याची सूचनाही केली होती. मात्र, यानंतरही ही महिला तरुणासोबत अनैतिक संबंध ठेवण्यावर ठाम होती.

दरम्यान, पोलिसांनी पती-पत्नी आणि या महिलेच्या बॉयफ्रेंडसोबत समझौताही केला होता. मात्र, एवढे होऊनही महिलेचे अफेअर सुरूच होते. अशा स्थितीत पत्नीच्या अवैध संबंधांना कंटाळून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला.

वास्तविक हे संपूर्ण प्रकरण गोरखपूरच्या राजघाट पोलीस स्टेशन हद्दीतील खुर्रमपूर परिसरातील आहे. जहानचे रहिवासी शरदचंद्र पाल पूर्वी स्कूल बस चालवायचे. पण, काही वर्षांपूर्वी त्यांनी स्वतःच्या घरात किराणा मालाचे दुकान उघडले. शरदचंद्र यांच्याशिवाय त्यांची पत्नी नीलम पाल (47) आणि एक मुलगा आणि मुलगी कुटुंबात राहत होते. मुलगी ग्रॅज्युएशन करत आहे. तर मुलगा सध्या दहावीत शिकत आहे. तर, भाडेकरू घराच्या वरच्या भागात राहतात.

हेही वाचा - मुलीने केलं Love Marriage, कोर्टात पित्याचं भयानक कृत्य, गोळ्या झाडून...

आरोपी पतीच्या म्हणण्यानुसार, त्याच्या पत्नीचे एका तरुणासोबत अवैध संबंध होते. हा तरुण त्याच्या पत्नीच्या वयापेक्षा सुमारे 25 वर्षांनी लहान आहे. शरदचंद्रने अनेकवेळा पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडला रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणावरून घरात बराच वाद झाला होता. इतकेच नव्हे तर पतीने एकत्र बसून पत्नी आणि तरुण यांना वेगळे होण्याबाबत समजावले होते. पण दोघांनीही ऐकले नाही. तसेच यानंतर या प्रकरणाबाबत राजघाट पोलीस ठाण्यात अनेकदा पंचायत झाली आणि पोलिसांनी तोडगा काढून दोघांना घरी पाठवले. पण, नीलम आणि प्रियकर कधीच वेगळे होऊ शकले नाहीत. यावर शरदचंद्र खूप नाराज होता. अखेर त्याने संतापात आणि समाजातील बदनामीच्या भीतीने पत्नीचा खून केला.

First published:

Tags: Crime news, Uttar pradesh, Women extramarital affair