मुंबई, 20 जून : शिशिर शिंदे यांनी मनसेतून शिवसेनेत प्रवेश केल्यानं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मला दु:ख झालं असल्याची प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिलीय. मनसेचे माजी आमदार शिशिर शिंदे यांनी काल मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला. न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधींने मनसे नेते बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता राज यांनी स्वत: शिशिर यांची समजूत काढली पण त्यांना पक्ष सोडून जायचंच होतं असंही नांदगावकर यांनी सांगितलं.
अखेर शिशिर शिंदेंची ‘घरवापसी’,कान धरून मागितली शिवसैनिकांची माफी
शिंदे हे गेल्या वर्ष-दीड वर्षापासून पक्षापासून अलिप्त राहिले होते असंही नांदगावकर यांनी म्हटलंय. राज ठाकरे यांनी मला लोकातून निवडलेला आमदार असं म्हणणारे शिंदे यांनी पक्ष कसा सोडला हा प्रश्नच आहे असंही नांदगावकर म्हणाले आहेत. शरद पवारांचा ‘खास’ निरोप घेऊन जितेंद्र आव्हाड राज ठाकरेंच्या भेटीला! आता त्यांना वाटलं शिवसेनेत जावं ते गेले, जे गेले त्याबद्दल आता काय बोलणार आहे. शिशिर शिंदे सेनेत गेले याचा आनंद आहे. पण जे शिशिर शिंदे माझ्याजवळ राज ठाकरेंनी मला आमदार बनवलं हे मी आयुष्यभर विसरणार नाही असं सांगणारा माणूस जेव्हा पक्ष सोडून जातो याबद्दल दु:ख होते. ते माझे जुने सहकारी होते. जवळचा सहकारी सोडून गेल्यामुळे दु:ख झाले असंही नांदगावकर यांनी सांगितलं.
बाळासाहेबांच्या एका आदेशावर शिशिर शिंदेंनी गाजवला होता ‘हा’ पराक्रम,पण…
तसंच आज उगवत्या सुर्याला लोकं जास्त नमस्कार करतात, कुठे काय मिळतं हे जास्त बघतात त्यामुळे काही बाहेर निघू नये याची तेवढी दक्षता मात्र ते घेतात असा टोलाही नांदगावकरांनी लगावला.

)







