बाळासाहेबांच्या एका आदेशावर शिशिर शिंदेंनी गाजवला होता 'हा' पराक्रम,पण...

आता आगामी निवडणुकीत शिशिर शिंदे उमेदवार म्हणून पाहण्यास मिळतात का हे पाहण्याचं ठरणार आहे.

Sachin Salve | Updated On: Jun 19, 2018 07:38 PM IST

बाळासाहेबांच्या एका आदेशावर शिशिर शिंदेंनी गाजवला होता 'हा' पराक्रम,पण...

मुंबई, 19 जून : "आता यापुढे एका खांद्यावर भगवा झेंडा आणि हातात धोंडा घेऊन कामाला लागणार" अशी घोषणा करत मनसेचे नेते शिशिर शिंदे अखेर आपल्या स्वगृही अर्थात शिवसेनेत दाखल झाले.

शिशिर शिंदे हे वयाच्या सतराव्या वर्षी शिवसेनेत दाखल झाले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत शिशिर शिंदे हे एक कट्टर शिवसैनिक म्हणून तयार झाले होते. 1992 साली शिवसेनेनं पाकिस्तानसोबत क्रिकेट सामन्याला कडाडून विरोध केला होता.

तेव्हा  बाळासाहेबांच्या एका आदेशावर शिशिर शिंदे यांनी चक्क वानखेडे स्टेडियमवरील भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्याची खेळपट्टीच उखडून टाकली होती. त्यांचा हा भीमपराक्रम शिवसेनेत चर्चेचा विषय ठरला होता. शिंदेंनी शिवसेनेतून विधान परिषदेसाठी प्रयत्न केला पण यात त्यांना अपयश आलं.

2006 मध्ये जेव्हा राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून बाहेर पडले  त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना सोडणारे शिलेदार हे शिशिर शिंदेच होते. शिशिर शिंदेंनी मनसेकडून लोकसभा लढवली आणि चिवट झुंज दिली होती.  संजय पाटील यांचा अवघ्या ३००० मतांनी निसटता विजय झाला होता. तर किरीट सोमय्या यांचा पराभव शिशिर शिंदे यांना मिळालेल्या मतांमुळे झाला होता.

अखेर शिशिर शिंदेंची 'घरवापसी',कान धरून मागितली शिवसैनिकांची माफी

त्यानंतर २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भांडुप विधानसभा मतदारसंघातून शिशिर शिंदे निवडणूक लढले आणि विजयी झाले. मनसेच्या 13 आमदारांपैकी शिशिर शिंदे एक होते.

स्वबळाचा नारा दिलाय, आता शांत बसू नका- आदित्य ठाकरे

2014 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेला सर्वात मोठा धक्का बसला. मनसेचे सर्व आमदार पराभूत झाले. शिशिर शिंदेही भांडुपमधून निवडणूक लढले होते पण त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर मनसे हा पक्ष पूर्णपणे खचला होता. 2017 साली मुंबई महापालिका निवडणूक निर्णय प्रक्रियेत डावलल्यामुळे शिशिर शिंदेंनी मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला.

डिसेंबरमध्ये लोकसभा निवडणूक ते पवारांची पगडी, उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे

वर्षभर पक्षातून डावल्यामुळे अखेर आज शिशिर शिंदेंनी घरवापसी करत शिवबंधनाचा धागा हाताला गुंडाळला. आता आगामी निवडणुकीत शिशिर शिंदे उमेदवार म्हणून पाहण्यास मिळतात का हे पाहण्याचं ठरणार आहे.

असे आहेत शिशिर शिंदे

१) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेले शिवसैनिक

२) शिवसेनेत २४ वर्षे विविध पदांवर कार्यरत

३) १९९२ साली वानखेडे स्टेडियमवरील भारत X पाकिस्तान क्रिकेट सामन्याची खेळपट्टी उखडून टाकणारे नेते.

४) शिवसेनेतून विधान परीषदेसाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यात अपयशी ठरले होते.

५) राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना सोडणारे शिलेदार

६) २००९ साली ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार किरीट सोमय्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय पाटील यांना कडवी झुंज दिली. संजय पाटील यांचा अवघ्या ३००० मतांनी निसटता विजय झाला होता. किरीट सोमय्या यांचा पराभव शिशिर शिंदे यांना मिळालेल्या मतांमुळे झाला होता.

७) २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भांडुप विधानसभा मतदारसंघातून विजयी

८) २०१४ साली भांडुप विधानसभा निवडणुकीत पराभव

९) २०१७ साली मुंबई महापालिका निवडणूक निर्णय प्रक्रियेत डावलल्यामुळे, मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा

१०) अखेर आज १९ जून रोजी शिवसेना वर्धापन दिनी शिवसेना पक्षात अधिकृत प्रवेश केला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 19, 2018 07:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close