मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /छातीत जळजळ आणि वजन वाढतंय? आधी टाळा 'हे' 3 पदार्थ

छातीत जळजळ आणि वजन वाढतंय? आधी टाळा 'हे' 3 पदार्थ

Diet Tips for Inflammation and weight gain: पांढऱ्या पदार्थांपासून तुम्हाला आहे धोका. रोज काय खाताय आणि किती प्रमाणात याकडे लक्ष द्यायला हवं.

Diet Tips for Inflammation and weight gain: पांढऱ्या पदार्थांपासून तुम्हाला आहे धोका. रोज काय खाताय आणि किती प्रमाणात याकडे लक्ष द्यायला हवं.

Diet Tips for Inflammation and weight gain: पांढऱ्या पदार्थांपासून तुम्हाला आहे धोका. रोज काय खाताय आणि किती प्रमाणात याकडे लक्ष द्यायला हवं.

  दिल्ली, 28 एप्रिल: आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेल्या तीन मॅक्रोन्यूट्रिएंट्समध्ये (Macronutrients in human body) कार्बोहायड्रेट्सचा (Carbohydrates) समावेश होतो. कार्बोहायड्रेट्स हे शरीराचा मेजर फ्युएल सोर्स असून, जे आपल्या यकृत आणि स्नायूंमध्ये ग्लायकोजेनच्या (Glycogen) रूपात साठवले जातात. स्नायूंमध्ये साठवलेलं हे ग्लायकोजेन वर्कआऊटदरम्यान आपल्याला बळ देतं. आपण कोणत्या प्रकारचे कार्बोहायड्रेट खातो आणि आपलं रूटिन काय आहे, यावर त्याचे फायदे-तोटे अवलंबून आहेत. काही विशिष्ट प्रकारच्या कार्बोहायड्रेट्सचं सेवन केल्यास पोटात, छातीत जळजळीचा (Inflammation) त्रास होऊ शकतो. त्यासोबत वजन वाढीच्याही (Weight Gain) समस्येला तोंड द्यावं लागू शकतं, असं न्यूट्रिशनिस्ट आणि कँडिडा डाएटच्या (Candida Diet) क्रिएटर लिसा रिचर्ड्स (Lisa Richards) म्हणतात. शी फाईंड्स डॉट कॉमनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

  जळजळीची समस्या जेव्हा तीव्र स्वरूप धारण करते तेव्हा ती अनेक गंभीर आजारांना निमंत्रण देणारी ठरते. जळजळीमुळे हृदयविकार(Heart Disease), कॅन्सर (Cancer) आणि डायबेटिस यांसारखे आजार होऊ शकतात. जळजळीमुळे तुमची चयापचय क्रिया (Metabolism) मंदावते.

  Health Tips: तूप खाताना थोडीशी काळजी घ्या; अशा लोकांनी जास्त खाल्ल्यास होतात नसते त्रास

  लिसा रिचर्ड्स यांनी तीन विशिष्ट कार्बोहायड्रेट्सबद्दल माहिती दिली आहे. ज्या कार्बोहायड्रेट्समुळे जळजळीची समस्या उद्भवू शकते. जर तुम्हाला जळजळीची समस्या टाळायची असेल आणि वजन कमी करायचं असेल तर तुम्ही अशी कार्बोहायड्रेट्स खाणं थांबवलं पाहिजे.

  पास्ता (Pasta)

  ‘पास्तामध्ये मोठ्या प्रमाणात कार्ब (Carb) असतात. त्यातील कार्ब्जमुळे जळजळ आणि वजन दोन्हीही वाढू शकतं.

  वाचा - सोशल हेल्थ म्हणजे काय? खराब सोशल हेल्थचे परिणाम, चांगल्या सोशल हेल्थसाठी काय आहेत उपाय

   लिसा रिचर्ड्स यांच्या म्हणण्यानुसार, आजकालच्या आपल्या आहारात आवश्यकतेपेक्षा जास्त कार्बोहायड्रेट्स असतात. यातील बहुतेक कार्बोहायड्रेट्स पास्तासारख्या प्रोसेस्ड फूडमधून शरीरात जातात. प्रोसेस्ड फूड (Processed Food) असलेल्या पास्तामुळे जळजळ, गॅस्ट्रोइंटेस्टीनल (Gastrointestinal) समस्या आणि वजन वाढीच्या समस्या उद्भवू शकतात. ग्राहकांनी होल ग्रेन्स किंवा तांदूळापासून बनवलेल्या तथाकथित 'निरोगी' पास्तापासून सावध राहिलं पाहिजे. असा पास्ता जळजळ आणि इतर आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकतो,’ असंही लिसा म्हणाल्या.

  व्हाईट ब्रेड (White Bread)

  आपल्यापैकी बहुतेक जण व्हाईट ब्रेड खातात. हा पदार्थ आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात हानिकारक ठरू शकतो. व्हाईट ब्रेडमुळे जळजळ, वजन वाढणं यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. रिफाईंड कार्बोहायड्रेट्सच्या (Refined Carbohydrates) मदतीनं व्हाईट ब्रेड तयार केला जातो. त्यामध्ये फायबर आणि इतर पोषक तत्त्वांचा अभाव असतो, असं रिचर्ड्स सांगतात. रिफाईंड कार्बोहायड्रेट्स अत्यंत दाहक (Extremely Inflammatory) असून ते शरीरातील शुगर लेव्हल वाढण्याचं काम करतात. परिणामी, शरीरातील ग्लुकोजमध्ये (Glucose) झटपट वाढ होते. व्हाईट ब्रेडमधील दाहक घटकांमुळे तुम्हाला थकवा आणि ब्रेन फॉगची (Brain Fog) समस्या जाणवू शकते. शिवाय यामुळे कॉग्निटिव्ह फंक्शनमध्येही (Cognitive Function) अडथळे निर्माण होतात.

  जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर व्हाईट ब्रेड हा तुमच्यासाठी सर्वांत वाईट पदार्थ आहे. कारण, रिफाईंड कार्बोहायड्रेट्सचं त्वरित विघटन होतं आणि ते तुमच्या शरीरात चरबीच्या रुपात स्टोअर होतात. म्हणून, जर तुम्हाला ब्रेड आवडत असेल तर व्हाईटऐवजी व्हिट ब्रेडला (Wheat Bread) प्राधान्य द्या, असं लिसा रिचर्ड्स यांनी सांगितलं आहे.

  जास्त साखर असलेली सीरियल्स

  साखरेचं प्रमाण जास्त असलेल्या सीरियल्समुळे (High-sugar Cereals) जळजळ होऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारचं ब्रेकफास्ट फूड (Breakfast Food) आपल्या आहारातून काढून टाकलं पाहिजे.

  Astrology: जन्मवारावरून एखाद्याचा स्वभाव कसा आहे ते कळतं; लगेच असं ओळखाल

   लिसा रिचर्ड्स स्पष्ट करतात की, 'अनेक ब्रेकफास्ट सीरियल्स हे रिफाईंड कार्बोहायड्रेट्सपासून बनवले जातात. त्यामुळे त्यात दाहक गुणधर्म आणि शुगर लेव्हल वाढवण्याची क्षमता असते.' म्हणूनच एचएफसीएस (HFCS), फ्रुक्टोज, सुक्रोज, कॅरामेल, कॅस्टर शुगर, ज्वारीचं सिरप, इन्व्हर्ट शुगर, इव्हॅपोरेटेड उसाचा रस किंवा एग्वेव्ह घटक असलेले पदार्थ टाळले पाहिजेत. रिफाईंड शुगर अत्यंत दाहक असते. त्यामध्ये एम्प्टी कॅलरीज (Empty Calories) असतात ज्या तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात, असंही लिसा म्हणाल्या.

  तसं पाहिल्यास, कोणत्याही प्रकारचा आहार हा परिपूर्ण नाही. परंतु, जर तुम्हाला जळजळची समस्या असेल आणि वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर वरील अन्नपदार्थ तुम्ही टाळले पाहिजेत.

  First published:

  Tags: Food, Health, Weight, Weight gain