तुपाचे फायदेही जाणून घ्या - तुपातील व्हिटॅमिन ई शरीरात अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते. कर्करोग, संधिवात आणि मोतीबिंदू यांसारख्या आजारांचा धोका कमी करण्यास मदत करते. तुपामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. तुपात वृद्धत्व विरोधी गुणधर्म असतात आणि ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते. तूप खाल्ल्याने मन तीक्ष्ण होते आणि स्मरणशक्ती सुधारते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)