मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सोशल हेल्थ म्हणजे काय? खराब सोशल हेल्थचे परिणाम, चांगल्या सोशल हेल्थसाठी काय आहेत उपाय

सोशल हेल्थ म्हणजे काय? खराब सोशल हेल्थचे परिणाम, चांगल्या सोशल हेल्थसाठी काय आहेत उपाय

काही लोकांना सामाजिक गोष्टींमध्ये सहभागी होणं खूप अवघड वाटतं. खराब सोशल हेल्थमुळे डोकेदुखी, तणाव आणि खाण्या-पिण्यासंबधी विकार होऊ शकतात. आरोग्याशी संबंधित काही गंभीर समस्या देखील खराब सोशल हेल्थचे कारण आहेत. जाणून घेऊया त्याविषयी

काही लोकांना सामाजिक गोष्टींमध्ये सहभागी होणं खूप अवघड वाटतं. खराब सोशल हेल्थमुळे डोकेदुखी, तणाव आणि खाण्या-पिण्यासंबधी विकार होऊ शकतात. आरोग्याशी संबंधित काही गंभीर समस्या देखील खराब सोशल हेल्थचे कारण आहेत. जाणून घेऊया त्याविषयी

काही लोकांना सामाजिक गोष्टींमध्ये सहभागी होणं खूप अवघड वाटतं. खराब सोशल हेल्थमुळे डोकेदुखी, तणाव आणि खाण्या-पिण्यासंबधी विकार होऊ शकतात. आरोग्याशी संबंधित काही गंभीर समस्या देखील खराब सोशल हेल्थचे कारण आहेत. जाणून घेऊया त्याविषयी

नवी दिल्ली, 27 एप्रिल : सोशल हेल्थ म्हणजे आपले सामाजिक आरोग्य (Social Health). म्हणजे एखाद्या व्यक्तीची नातेसंबंधातील लोकांशी संवाद साधण्याची, त्यांच्यामध्ये राहण्याची आणि तेथे जुळवून घेण्याची क्षमता. जीवन जगत असताना आपण अनेक नातेसंबंधांमध्ये मिसळतो, मित्रांसह, सहकाऱ्यांसोबत आणि सहलीवर सोबत आलेल्या पर्यटकांसोबत. माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे, तो ज्यांच्यावर प्रेम करतो किंवा जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांच्यासोबत नेहमीच असतो. ते मित्र, कुटुंब, ऑफिस सहकारी, फ्लॅटमेट इत्यादी असू शकतात. तुम्ही त्यांच्याशी कसा संवाद साधता याचा तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर लक्षणीय परिणाम (What is Social Health) होतो.

काही लोकांना सामाजिक गोष्टींमध्ये सहभागी होणं खूप अवघड वाटतं. खराब सोशल हेल्थमुळे डोकेदुखी, तणाव आणि खाण्या-पिण्यासंबधी विकार होऊ शकतात. आरोग्याशी संबंधित काही गंभीर समस्या देखील खराब सोशल हेल्थचे कारण आहेत. म्हणजे -

नैराश्य

चिंता

डोकेदुखी

कमकुवत प्रतिकारशक्ती

हृदयरोग

उच्च आणि निम्न बीपी पातळी

अचानक वजन वाढणे किंवा वजन कमी होणे

खाण्याचे विकार

हार्मोनल असंतुलन

ताण

या समस्या दीर्घकाळ राहिल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे आपले सामाजिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले पाहिजेत. हे करण्याचे दोन मार्ग आहेत.

सामाजिक कार्यात सहभागी व्हा -

प्रत्येकाने आपले सामाजिक संबंध सुधारण्यासाठी कोणत्या ना कोणत्या सामाजिक कार्यक्रमात प्रत्येकाशी संवाद साधणे, एकत्र येणे, नृत्य, काही वर्कशॉपमध्ये सहभागी होणे, उद्यानात जाणे, सामाजिक चर्चेत भाग घेणे आवश्यक आहे. असे केल्याने आपली सोशल हेल्थ चांगली राहते आणि भविष्यात कोणतेही गुंतागुंतीचे आजार टाळता येतात.

हे वाचा - Gourd benefit: दुधी भोपळा खाण्याचे हे आहेत 5 फायदे; अनेक आजार आपोआप कमी होतात

निरोगी आणि संतुलित जीवनशैली -

धुम्रपान, मद्यपान आणि ड्रग्जमुळे तुमच्या शारीरिक आरोग्याला खूप नुकसान होते. मज्जासंस्थेपासून ते स्नायू आणि फुफ्फुस आणि यकृत यांसारख्या अंतर्गत अवयवांपर्यंत, या सवयींचे आरोग्याशी संबंधित अनेक तोटे आहेत जे प्रत्येकाने टाळले पाहिजेत. व्यायाम किंवा योगासने, झोपेचे चांगली सवय आणि निरोगी आहाराची दिनचर्या, यामुळे सोशल हेल्थ बऱ्याच प्रमाणात सुधारण्यास मदत होऊ शकते.

हे वाचा - बॉडी स्ट्रेचिंग करणे का गरजेचे आहे? सर्वात महत्त्वाची ही 5 कारणं जाणून घ्या

चांगले संवाद कौशल्य -

तुमच्या सामाजिक संवाद कौशल्यांवर काम करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे चांगला संवाद साधायला शिकणे. तुमचे विचार आणि कल्पना प्रभावीपणे शब्दात मांडता आल्यास, तुम्ही तुमचे मन बोलून हलकं करू शकताच. शिवाय लोकांसोबत एक चांगलं नातं निर्माण करून आपण कोणालाही प्रभावित करू शकता. तुमच्या आवडत्या व्यक्तीपासून किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीपासून गोष्टी लपवून ठेवल्याने नात्यात समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून, आपल्या सर्व समस्या, कमकुवतपणा आणि विचारांशी संवाद साधण्याची कला शिकल्याने आपल्याला सोशल हेल्थचे चांगले नियमन करण्यास मदत होऊ शकते.

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips