औरंगाबाद, 27 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मुंबई, पुणे, ठाण्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्येही कोरोनाने थैमान घातले आहे. औरंगाबादमध्ये आज कोरोनाने आणखी एक बळी घेतला आहे. औरंगाबादमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत असलेल्या किलेअर्कमधील 60 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेला 25 एप्रिल रोजी दाखल करण्यात आलं होतं. आज उपचारादरम्यान, या महिलेचा दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. हेही वाचा - पुण्यातील कोरोनाचं मूळ नष्ट करण्यासाठी मोठं पाऊल, हॉटस्पॉटसाठी नवी मोहिम लेफ्ट साईडेड न्यूमोनायटिस विथ डायबेटिस विथ हायपरटेंशन विथ हायपोथायरॉडीझम या आजारामुळे या महिलेला 25 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल केलं होतं. दाखल केल्यानंतर या महिलेची कोरोनाची चाचणी केली असता तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आला होता. या महिलेची प्रकृती चिंताजनक होती. आज दुपारी या महिलेचा अखेर मृत्यू झाला. औरंगाबादमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याचं चित्र आहे. शहरात आतापर्यंत 53 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हेही वाचा - पोलीस दादा, काळजी घ्या! राज्यातली धक्कादायक आकडेवारी समोर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात लॉकडाउनचे नियम कडक करण्यात आले आहे. ज्या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे, असा परिसर सील करून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. शहरात जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकानं बंद असून वाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे. संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.