मुंबई, 14 ऑक्टोबर : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांनी तर भाजपकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. ऋतुजा लटके यांना काँग्रेस-राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे, तर मुरजी पटेल यांना शिंदेंच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचा पाठिंबा आहे. महाविकासआघाडी म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीने ऋतुजा लटके यांना पाठिंबा दिला असला, तरी ठाकरेंनी या मतदारसंघातून डमी उमेदवार रिंगणात उतरवला आहे. ऋतुजा लटके यांच्यासह संदीप नाईक यांनीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत ‘मशाल’ सोडणार साथ? ठाकरे पुन्हा गोत्यात! संदीप नाईक ये युवासेनेचे पदाधिकारी आहेत, तसंच ते शिवसेनेचे अंधेरीमधले माजी नगरसेवकही होते. ऋतुजा लटके यांच्या अर्जाच्या तपासणीवेळी काही अडचण आली तर संदीप नाईक अर्ज मागे घेतील, असं अनिल परब यांनी सांगितलं आहे. लटकेंचा राजीनामा वादात ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरूनही बराच वाद निर्माण झाला होता. अंधेरीच्या पोटनिवडणुकीत विजय झाला, तर आपला राजीनामा मंजूर करा, असा अर्ज लटके यांनी मुंबई महापालिकेकडे सप्टेंबर महिन्यात केला होता. लटकेंचा राजीनामा अटींसह असल्यामुळे त्यांना पुन्हा 3 ऑक्टोबरला राजीनामा द्यावा लागला. हा राजीनामा स्वीकारला जात नसल्यामुळे त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली, अखेर हायकोर्टाने लटके यांचा राजीनामा घ्यायचे आदेश मुंबई महापालिकेला दिले. ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेच्या कर्मचारी होत्या. नियमानुसार सरकारी कर्मचाऱ्याला निवडणूक लढवण्यासाठी नोकरीचा राजीनामा द्यावा लागतो. अंधेरीचा ग्राऊंड रिपोर्ट! मराठी, गुजराती, उत्तर भारतीय… कुठला मतदार ठरणार जाएंट किलर!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.