नरेंद्र मते, प्रतिनिधीवर्धा, 06 सप्टेंबर : अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वारासह 3 जण जागीच ठार झाले. राष्ट्रीय महामार्ग सहावर पहाटेच्या सुमारास तळेगाव येथील उड्डाण पुलावर ही घटना घडली. या अपघातातील मृतकांची अद्याप ओळख पटली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात मृत झालेले तिघे जण हे महामार्गावर उशिरा रात्री हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते. जेवण केल्यानंतर ते पुढील प्रवासा करिता निघाले. हॉटेलपासून काही अंतर दूर गेले असता दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली.
कंगनाने महाराष्ट्राची माफी मागितली तर.., संजय राऊतांचे मोठे विधान
हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी चक्काचुर झाली. अज्ञात वाहनाने इतक्या जोरात धडक दिली की, दुचाकी काही अंतर दूरपर्यंत फरफटत नेली होती. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. अपघातात मृत पावलेल्या तिघांचे मृतदेह हे ओळखण्या परिस्थितीत नव्हते.
अपघाताची माहिती मिळताच तळेगाव (शाम.पंत) पोलीस घटनास्थळावर पोहोचले. तिन्ही तरुणांना आर्वीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
बापरे! 12 फूट लांब अजगरानं एका फटक्यात गिळली नीलगाय, पुढे काय झालं पाहा PHOTOS
अपघातातील युवक बौद्ध धर्माचे प्रसारक असल्याचे कळते. मात्र, त्यांची अद्याप ओळख पटली नाही. पुढील तपास तळेगाव पोलीस करीत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.