महाराष्ट्रात स्वबळावर लढण्याची भाजपची तयारी : अमित शहांचा कार्यकर्त्यांना आदेश

महाराष्ट्रात स्वबळावर लढण्याची भाजपची तयारी : अमित शहांचा कार्यकर्त्यांना आदेश

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना महाराष्ट्रात स्वबळावर लढण्याची तयारी करण्याचे आदेश दिले अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

  • Share this:

मुंबई,ता.22 जुलै: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना महाराष्ट्रात स्वबळावर लढण्याची तयारी करण्याचे आदेश दिले अशी माहिती सूत्रांनी दिलीय. मुंबईत पक्षाच्या विस्तारकांची आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांनी मार्गदर्शन केलं. महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा आणि 288 विधानसभा मतदारसंघात स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रस आणि राष्ट्रवादी हे तिनही पक्ष एकत्र आले तरी भाजप विजयी झाला पाहिजे या जोमानं तयारी करण्याचे आदेशही त्यांनी दिलेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणूका शिवसेनेला सोबत घेऊन लढवण्याची भाजपची इच्छा आहे मात्र शिवसेना त्यासाठी तयार नाही. 2014 च्या विधानसभा निवडणूकीत दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड कटुता निर्माण झाली होती. ही कटुता विसरून पुढे जाण्यास शिवसेना तयार नाही. तर 2014 सारखी स्थिती सध्या नसल्याने स्वबळावर लढण्यात धोका आहे याची जाणिव भाजपला आहे. तर तर भाजपची कोंडी करण्याची हीच वेळ आहे याची जाणीव शिवसेनेला आहे त्यामुळं भाजपला शेवटपर्यंत झुलवत ठेवण्याची खळी शिवसेनेकडून खेळली जावू शकते याची जाणीव भाजपला आहे. त्यामुळे अमित शहा महाराष्ट्रातल्या तयारीकडे खास लक्ष देत असून राज्यात उत्तर प्रदेशनंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत.

अमित शहांचा कार्यकर्त्यांसाठी 'अॅक्शन प्लान'.

1) सोशल मीडियावर असलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रिय करा.

2) एक बुथ 25 कार्यकर्ते अशी योजना तयार करा.

3) प्रत्येक बुथवर 5 कार्यकर्त्यांकडे मोटरसायकल असेल याची काळजी घ्या.

4) प्रत्येक बुथ मधल्या मंदिराची माहिती, त्यांचे ट्रस्टी आणि पुजाऱ्याचा नंबर याची यादी तयार करा.

5) प्रत्येक बुथ मधल्या मशिदीची यादी तयार करणे

6) सरकारच्या योजनेच्या लाभार्थ्यांची यादी तयार करा.

7) तीनही पक्ष एकत्र आले तरी भाजपला 51 टक्के मतदान होईल याची काळजी घ्या.

8) आपल्या विभागातल्या जनतेशी सातत्याने संपर्कात राहा.

9) मुद्रा बँकेतून जास्तित जास्त जणांना लोन देण्याचा प्रयत्न करा.

10) प्रत्येक बुथ मध्ये 10 एससी, 10 एसटी, 10 ओबीसी कार्यकर्त्यांची फळी तयार करा.

11) पाच घरांसाठी एक भाजप कार्यकर्ता राहिल याची काळजी घ्या.

12) अन्य पक्षात काय चाललं याची माहिती ठेवा.

13) अन्य पक्षातल्या नाराज कार्यकर्त्यांची यादी तयार करा आणि त्यांच्या संपर्कात राहा.

14) एकदा जिंकलं म्हणजे दुसऱ्यांदा जिंकेल याची खात्री नाही हे लक्षात घेऊन काम करा.

15) विस्तारकांना ऑनलाईन रिपोर्टींग करावं लागेल. त्यांच्यासाठी वेगळं मोबाईल अॅप तयार करणार.

16) सरकारकडून काम करून दिलं जाईल असं आश्वासन विस्तारकांनी देवू नये.

 

 

First published: July 22, 2018, 5:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading