• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • 'मी कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?', मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मिळालेल्या पत्राने खळबळ

'मी कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?', मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मिळालेल्या पत्राने खळबळ

मी खूप घाबरुन गेलो आहे आणि मला खूप टेन्शन आलं आहे. मी कोरोना पॉझिटिव्ह आहे की नाही असा प्रश्न माझ्यासमोर आहे असं तरुणाने पत्रात म्हटलं आहे.

  • Share this:
अहमदनगर, 26 ऑगस्ट : राज्यात कोरोनाचा हाहाकार कमी होण्याचं नाव घेत असताना रुग्णांच्या अहवाला संदर्भात धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. आताही असाच एक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाला आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आही की निगेटिव्ह असा प्रश्न पडल्यामुळे त्याने थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं असल्याचं सांगण्यात येत आहे. कोरोना रिपोर्ट खाजगीत पॉझिटिव्ह सरकारी निगेटिव्ह आणि पुन्हा खाजगीत पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. त्यामुळे रुग्ण आणि त्याचे कुटुंब चिंतेत आहेत. 21 ऑगस्टला अहमदनगर इथल्या संतोष साळवे याचा खाजगी रुग्णालयात कोरोना टेस्ट केली असता पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. त्यानंतर त्याने लगेच शासकीय रुग्णालय गाठले आणि पुन्हा चाचणी केली तेव्हा 23 तारखेला रिपोर्ट निगेटिव्ह आला. एक तासातच दोन वेगवेगळे रिपोर्ट आल्याने त्याने पुन्हा 24 तारखेला खाजगी रुग्णालयात टेस्ट केली तर त्याचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आला. क्या बात है! मृत्यूदर घटला तर रिकव्हरी रेट वाढला, वाचा लेटेस्ट आकडेवारी या दोन वेगळ्या ठिकाणच्या टेस्ट वेगळ्या कशा येऊ शकतात. यावरुन गोंधळ उडाला आहे. त्यामुळे तरुणाने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून कोणता रिपोर्ट खरा यासंबंधी विचारणा केली आहे. मी खूप घाबरुन गेलो आहे आणि मला खूप टेन्शन आलं आहे. मी कोरोना पॉझिटिव्ह आहे की नाही असा प्रश्न माझ्यासमोर आहे असं तरुणाने पत्रात म्हटलं आहे. मुंबईत कोरोनासंदर्भात धक्कादायक माहिती, 11287 पॉझिटिव्ह रुग्णांना लक्षणं नाहीत! नेमका कोणता अहवाल खरा? खाजगी रुग्णालय म्हणतं रुग्ण पॉझिटिव्ह तर सरकारी यंत्रणेत तोच रुग्ण निगेटिव्ह असल्याचं म्हटलं आहे. एक तासांचे अंतर असले तरी उशिराची टेस्ट सरकारी आल्याने त्यांनी पुन्हा 24 तारखेला खाजगीत स्टेट केली आणि पुन्हा निगेटिव्ह रिपोर्ट आला आहे. त्यामुळे नागरिकांचा गोंधळ स्वाभाविक आहे. दरम्यान, अशा तक्रारी वारंवार समोर येत आहे पण खरा रिपोर्ट कोणाचा मानावा हाच मोठा प्रश्न आहे.
Published by:Renuka Dhaybar
First published: