नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आज 32 लाख पार झाली आहे. आतापर्यंत एकूण 32 लाख 34 हजार 475 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, गेल्या 24 तासांत 67 हजार 151 लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आज एका दिवसात 1059 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या 7 लाख 07 हजार 267 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 24 लाख 67 हजार 759 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण 59 हजार 449 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इंडियन काउन्सिक ऑफ मेडिकल रिसर्चनं (ICMR) दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत 3 कोटी 76 लाख 51 हजार 512 टेस्टिंग करण्यात आल्या आहेत. यातील 8 लाख 23 हजार 992 लोकांची चाचणी मंगळवारी एका दिवसात करण्यात आली.
वाचा-...म्हणून देशात वेगानं होतोय कोरोनाचा प्रसार; आताच व्हा सावध! ICMR ने दिला इशारा
India's #COVID19 case tally crosses 32 lakh mark with 67,151 fresh cases and 1,059 deaths in the last 24 hours.
The COVID-19 case tally in the country rises to 32,34,475 including 7,07,267 active cases, 24,67,759 cured/discharged/migrated & 59,449 deaths: Ministry of Health pic.twitter.com/pfoJqCg2FY
— ANI (@ANI) August 26, 2020
वाचा-मुंबईत कोरोनासंदर्भात धक्कादायक माहिती, 11287 पॉझिटिव्ह रुग्णांना लक्षणं नाहीत!
मृत्यूदर घटला
देशातील मृत्यूदर आणि अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत सतत घट होत आहे. मृत्युदर 1.83% झाला आहे. तर, अॅक्टिव्ह रेट 22% आहे. यासह भारताचा रिकव्हरी रेट हा 76% झाला आहे. जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारताचा रिकव्हरी रेट जास्त आहे.
मास्क न वापरल्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ
भारतात कोरोना व्हायरसचा प्रसार होण्यास बेजबाबदार, काळजी न घेणारे आणि मास्क न घालणारे लोकच जबाबदार आहेत असा इशारा ICMRचे प्रमुख बलराम भार्गव यांनी दिला आहे. भारतातल्या कोरोना रुग्णांची आकडेवारी देत त्यांनी देशातली परिस्थिती नियंत्रणात असल्याचं स्पष्ट केलं. भारतातील 0.29 टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत तर 1.92 टक्के रुग्ण आयसीयूमध्ये तर 2.7 टक्के रुग्णांना ऑक्सिजन देण्यात आलेला आहे. याचबरोबर भार्गव यांनी असेही सांगितले दुसरा सीरो सर्व्हे सुरू करण्यात आला आहे, सप्टेंबरपर्यंत त्याचे निकाल येतील.