लॉकडाउनमध्ये दारू विक्री बंद असतानाही गडबड, प्रशासनाने केली मोठी कारवाई

लॉकडाउनमध्ये दारू विक्री बंद असतानाही गडबड, प्रशासनाने केली मोठी कारवाई

अहमदनगरमध्ये दारू विक्री बंद असतानाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • Share this:

अहमदनगर, 30 एप्रिल : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली आहे. दारू विक्रीसाठीही बंदी घालण्यात आली आहे. परंतु, अहमदनगरमध्ये दारू विक्री बंद असतानाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अहमदनगरमध्ये लॉकडाउनमध्ये अवैध दारुविक्री सुरू असल्याच्या तक्रार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आली होती. त्यानंतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरात मद्यसाठ्याची मोजणी केली असता मोठी तफावत आढळली होती.

हेही वाचा - देशात कोरोनाचा कहर, मागच्या 24 तासांतील ही आहे धक्कादायक आकडेवारी

त्यावर कारवाई करत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील 9 दारू दुकानांचे परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले. त्यात सात परमिट रूम, एक बिअर शॉपी आणि देशी मद्याचा किरकोळ विक्रेता यांचा समावेश आहे. मात्र, अहमदनगर शहरातील दुकाने, बार यातून सुटले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील  निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये हॉटेल गोविंदा गार्डन ( निमगाव जाळी, ता. संगमनेर), हॉटेल नेचर ( वडगावपान, ता. संगमनेर), हॉटेल गोल्डन चॅरियट (बेलापूर, ता. श्रीरामपूर), हॉटेल धनलक्ष्मी (देवळाली प्रवरा), हॉटेल उत्कर्ष (सोनगाव सात्रळ, ता. राहुरी), हॉटेल ईश्वर (वडझिरे, ता. पारनेर), हॉटेल मंथन ( निघोज, ता. पारनेर), देशी दारू किरकोळ विक्री सीएल - ३, संगमनेर आणि आनंद बिअर शॉपी (निमगाव कोन्हाळे, राहाता) यांचा समावेश आहे.

हेही वाचा -'योगी महाराजांचे बरे चालले', साधूंच्या हत्येवरून शिवसेनेचा फडणवीस-शहांना टोला

जिल्ह्यात यापुढेही अशाच स्वरुपाची कडक कारवाई करण्यात येणरा आहे. मात्र, अहमदनगर शहरात अनेक तक्रारी आल्या होत्या त्यावर कारवाई होणार का हे पाहावे लागेल.

संपादन - सचिन साळवे

First published: April 30, 2020, 10:31 AM IST
Tags: alcohol

ताज्या बातम्या