नवी दिल्ली, 30 एप्रिल : देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग थांबण्याचं नाव घेत नाहीय. लॉकडाऊन आणि प्रतिबंधात्मक उपया करूनही संसर्ग वाढताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 33 हजारवर पोहोचला आहे. मागच्या 24 तासांत कोरोनाच्या 1 हजार 718 नवीन केसेस समोर आल्या आहेत. तर 67 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1 हजार 74 वर पोहोचली आहे. देशात दिलासा देणारी दुसरी गोष्ट म्हणजे 8 हजार 325 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून होम क्वारंटाइन राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 3 मेपर्यंत लॉकडाऊन आहे पण तरीही खबरदारीचा उपाय म्हणून काही राज्यांनी हा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही सेवा आणि दुकानं उघडण्याची परवानगी मिळाली आहे. त्याचबरोबर या सर्वांमध्ये एक दिलासादायक बातमी आहे. देशात कोरोना संसर्गाची प्रकरणे दुप्पट होण्याची गती कमी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने यापूर्वी 20 एप्रिल रोजी सांगितले होते की देशात कोरोनाव्हायरसचे प्रमाण दुप्पट करण्यास 7.5 दिवस लागतात. हे वाचा- अमेरिका हादरलं! प्रत्येक तासाला 42 लोकांचा मृत्यू, आकडा पोहचला 61 हजारांवर
With 1718 new cases & 67 deaths in the last 24 hours, the total number of #COVID19 positive cases in India rises to 33050 (including 23651 active cases, 1074 deaths, 8325 cured/discharged/migrated): Union Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/CHfLjMn8Iq
— ANI (@ANI) April 30, 2020
देशभरात महाराष्ट्र आणि मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 9915 वर पोहोचली आहे. तर दिल्ली, मध्य प्रदेशातही कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे. पंजाब सरकारनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2 आठवडे लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 3 मेनंतर लॉकडाऊनबाबतच्या मार्गदर्शक सूचना नंतर प्रसिद्ध केल्या जातील. परंतु असे म्हटले जात आहे की गेल्या 28 दिवसांपासून कोरोनाचे एकही प्रकरण समोर न आलेल्या परिसरांना सूट मिळू शकते. त्याशिवाय गेल्या 14 दिवसांत कोरोनाची कोणतीही नवीन प्रकरणे नसलेल्या क्षेत्रावरील काही निर्बंध हटवले जाऊ शकतात. याशिवाय रेड झोनमध्येही काही सूट मिळू शकते. परंतु याक्षणी हॉटस्पॉट झोनमध्ये कोणतीही सूट देण्यात येणार नाही आहे. हे वाचा- धारावीत अन्नवाटप करणाऱ्या मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू संपादन- क्रांती कानेटकर