मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

रणबीर कपूर-संजय लीला भंसाळीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आलिया भट्टही होम क्वारंटाइन

रणबीर कपूर-संजय लीला भंसाळीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आलिया भट्टही होम क्वारंटाइन

Alia Bhatt Corona Updates: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) या दोघांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह (Corona Positive) आल्यानंतर आलिया भट्टनेही स्वत: ला अलग (Quarantine) केलं आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 09 मार्च:  बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह (Corona Report Positive) आला आहे. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संजय लीला भन्साळीने स्वत:ला विलगीकरणात (quarantine) ठेवलं आहे. तो त्याच्या आगामी गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होता. रणबीर कपूर आणि संजय लीला भन्साळी या दोघांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आलिया भट्टनेही (Alia Bhatt) स्वत:ला अलग केलं आहे. यामुळे 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटाचं शूटिंग पुढं ढकलण्यात आलं आहे. पण अद्याप याबाबतची अधिकृतपणे पुष्टी करण्यात आलेली नाही.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाशी निगडीत असणाऱ्या एका जवळच्या स्त्रोताने सांगितलं आहे की, "संजय लीला भन्साळी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वतःला अलग ठेवलं आहे. संजय लीला भन्साळी आणि रणबीर यांच्या कोरोना पॉझिटिव्हच्या बातम्या समोर आल्यानंतर आलियानेही स्वत: ला अलग केलं आहे. तसेच भन्साळींच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेण्यात येत आहे. यासंबंधी सूत्रांनी सांगितलं की, संजयची आई लीला भन्साळी ठीक आहेत. सूत्रांच्या मते 'भन्साळींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम आपल्या आईची कोरोना चाचणी केली आहे.  ज्यामध्ये भन्साळींच्या आईला कोरोना संसर्गाची पुष्टी झालेली नाही, परंतु सुरक्षिततेच्या अनुषंगाने त्यांनाही अलग ठेवण्यात आलं आहे.

हे ही वाचा- बॉलिवूडमध्ये पुन्हा COVID-19चा शिरकाव, रणबीर कपूरनंतर संजय लीला भंसाळी पॉझिटिव्ह

तत्पूर्वी नीतू कपूर यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन रणबीरचा फोटो शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये नीतू यांनी लिहिलं होतं, की आपल्या काळजीसाठी आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद. रणबीरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्याच्यावर औषधोपचार सुरू असून त्याची प्रकृती ठीक आहे. तो सध्या होम क्वारंटाईन आहे आणि संपूर्ण काळजी घेत आहे. नीतू यांच्या या पोस्टवर कमेंट करुन चाहत्यांनी रणबीरला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तर काहींनी तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे.

हे ही वाचा-12 वर्षानंतर अभिनय क्षेत्रात कमबॅक करणार अभिनेत्री, आता आहे राजकारणात सक्रीय

खरंतर, संजय लीला भन्साळीने नुकताच त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता, त्यामध्ये आलिया भट्ट देखील होती. यावेळी भन्साळी यांनी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित झाला. ज्यामध्ये चाहत्यांना आलिया भट्टची तिच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात विशेष व्यक्तिरेखा पाहायला मिळाली. या 1 मिनिट 30 सेकंदाच्या टीझरमध्ये अलियाने सर्वांची मनं जिंकली आहेत. टीझर पाहूनच अनेकांनी तिच्या अभिनयाचं कौतुक करायला सुरुवात केली आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Corona spread, Covid-19 positive, Ranbir kapoor, Sanjay Leela Bhansali