मुंबई, 09 मार्च: बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood actress) उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर राहिल्या आहेत. तब्बल 12 वर्ष चित्रपटापासून दूर राहिल्यानंतर त्या आता मोठ्या पडद्यावर पुनरागमन (Urmila Matondkar come back in bollywood ) करणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः एका मुलाखतीत दिली आहे. त्यामुळे 90 च्या दशकात प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे, त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढत आहे. खरंतर, 2019 मध्ये उर्मिला मातोंडकर यांनी राजकारणात प्रवेश केला होता. त्यामुळे त्या परत चित्रपट क्षेत्रात येणार नाहीत, अशा प्रकारची माहिती समोर येत होती. येथून पुढे त्या पूर्णवेळ राजकारणचं करतील असं म्हटलं जात होतं. पण त्यांनी नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटांत पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी आपल्या मुलाखतीत म्हटल्या की, त्या लवकरच एका वेब सीरीजमध्ये काम करताना दिसणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या वेब सीरीजचं शूटिंग (Web series shooting) गेल्या वर्षी सुरू होणार होतं. मात्र अचानक उद्भवलेल्या कोरोना साथीमुळे (Corona pandemic) याचं शूटिंग पुढे ढकलण्यात आलं होतं. ही वेब सीरीज एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार होती. पण कोरोना साथीमुळे अद्याप या वेब सीरीजच्या शुटींगलाही सुरुवात झालेली नाही. ही वेब सीरीज कोणत्या विषयावर असेल याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही. दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी याबाबत गुप्तता पाळली आहे. (हे वाचा - ड्रग्ज प्रकरणात उर्मिला मातोंडकरांच्या अडचणी वाढल्या, हिमाचलच्या वकिलानं बजावली नोटीस ) मुलाखती दरम्यान मातोंडकर यांनी आपल्या चित्रपट करियरला पुन्हा एकदा उजाळा दिला आहे. यावेळी त्यांनी म्हटलं की, आता असं वाटत आहे की, मी पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करेल. जेव्हा मी माझ्या चित्रपट कारकीर्दीबाबत विचार करते, तेव्हा मला वाटतं की, मी दर्शकांच्या मनात मी माझं स्थान निर्माण केलं आहे. माझं चित्रपट करियर यशस्वी आहे. त्यामुळे माझ्या करियरची मी अशा प्रकारे समाप्ती करणार नाही. मला माहित नाही की, माझा आगामी प्रोजेक्ट किती यशस्वी होईल, पण याबाबत मला विचार करायचाही नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.