मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

3 मे रोजी लॉकडाऊन संपणार त्यानंतर काय? उद्धव ठाकरेंच्या जनता संवादातील ठळक मुद्दे

3 मे रोजी लॉकडाऊन संपणार त्यानंतर काय? उद्धव ठाकरेंच्या जनता संवादातील ठळक मुद्दे

मुंबईत थोडीफार सूट दिली पण लगेच लोकांची वरदळ वाढली. हे आपल्याला परवडणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मुंबईत थोडीफार सूट दिली पण लगेच लोकांची वरदळ वाढली. हे आपल्याला परवडणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मुंबईत थोडीफार सूट दिली पण लगेच लोकांची वरदळ वाढली. हे आपल्याला परवडणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

  • Published by:  Manoj Khandekar
मुंबई, 26 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बातनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक महत्वाच्या विषयांवर लोकांना मार्गदर्शन केलं. तर 3 मेनंतर काय ? यावर सरकार कसं काम करत आहे याबद्दलही उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली. लॉकडाऊनमुळे खूप चांगले परिणाम झाले आहेत. या संकटाचा वेग आवरण्यात आपण यशस्वी झालो. इतर देशात झपाट्याने रुग्ण वाढले. पण आपण बऱ्यापैकी आटोक्यात आणलं. मुंबईत थोडीफार सूट दिली पण लगेच लोकांची वरदळ वाढली. हे आपल्याला परवडणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 3 मेनंतर राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा लक्षात घेऊन पुढे योग्य ती पाऊलं उचलली जातील. गर्दी आणि सोशल डिस्टसिंग पाळावंच लागेल. ज्या ठिकाणी हॉटस्पॉट आहे तिथे बारकाईने काम सुरू आहे. पण जिथे कोरोना रुग्ण नाही तिथे जिल्ह्यांच्या सीमा उघडण्यात येणार नाही पण जिल्हाअंतर्गत काम आणि उद्योग सुरू करण्यात आले आहेत. याचा रोज आढावा घेतला जाईल. रोज यावर लक्ष ठेवलं जाईल आणि मग लॉकडाऊन कसं उघडता येईल याचा विचार होईल. पृथ्वीचं मोठं संकटं टळलं! ओझोनवरील छिद्र अचानक झालं बंद, हे कोरोनामुळे झालं? मुख्यमंत्र्यांच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे - रस्त्यावर येऊन नमाज पडण्याची ही वेळ नाही. त्यामुळे घरातच बसून प्रार्थना करा. सगळी धार्मिक स्थळं बंद आहे. - देव आपल्यामध्ये आहे. डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार, पोलीस हे देव आहेत. देव आता सत्यात येऊन आपल्या मदत करत आहेत - आपल्या दोन कॉन्स्टेबलाचा मृत्यू झाला. त्यांना नम्रतापूर्वक श्रद्धांजली वाहतो - पोलीस आपल्या जीवाची परवा न करता सगळ्यांसाठी लढत आहेत. त्यांनी आज आपल्या दोन जवानांना गमावलं आहे. त्यांच्या कुटुंबाला शक्य तेवढी मदत करू - लॉकडाऊनमुळे खूप चांगले परिणाम झाले आहे. या संकटाचा वेग आवरण्यात आपण यशस्वी झालो. इतर देशात झपाट्याने रुग्ण वाढले. पण आपण बऱ्यापैकी आटोक्यात आणलं - या आजारावर मात करण्यासाठी डॉक्टरांचं, शास्त्रज्ञांचं पथकं काम करत आहे. या रोगावर उपाय शोधण्यासाठी सर्वपातळीवर प्रयत्न सुरू आहेत - या सगळ्यात खासकरून नितीन गडकरी यांचं अभिनंदन. कारण, राज्यात आणि केंद्रात चांगला एकोपा असताना राजकराण न करता तुम्ही काम असा सगळ्यांना सल्ला दिलात त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद देतो महाराष्ट्रासाठी सर्वात दु:खद बातमी, 24 तासात 2 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू - (यावेळी उद्धव ठाकरे हिंदीत बोलले)मी मुद्दाम हिंदीत बोललो कारण वरती कळेल की मी त्यांचं कौतूक केलं - या रोगाचा फैलाव कमी होताच सगळ्यांना आपल्या घरी जाण्याची परवाणगी मिळेल. अनेक लोक अडकले आहेत. त्यांच्यासाठी नक्कीच काहीतरी करू. पण हे काम संयामाने होईल. नाहीतर लॉकडाऊनचा फायदा होणार नाही - केंद्राचं पथक मुंबई आणि पुण्यात बसलं आहे. पण याच्यात काही राजकारण नाही आहे. काही लोक म्हणाले 'डाल में कुछ काला है', पण आम्ही त्यांच्याकडूनच डाळ मागत आहोत. - 3 मेला हा लॉकडाऊन संपणार त्यानंतर काय? यावर अद्याप काहीच सांगू शकत नाही. कारण मुंबईत थोडी मुभा दिली तर वरदळ वाढली. पण आता तसं करणं शक्य नाही. - सोशल डिस्टंसिंग ठेवा समाजातील अंतर नव्हे. गर्दी टाळूनच पुढे जावं लागेल. - जिल्ह्यांच्या सीमा उघडल्या जाणार नाहीत. पण जिल्ह्यांअंतर्गत काम सुरू करण्यात आलं आहे. त्यानुसार 3 मेनंतर काय करायचं हे ठरवू - ज्यांना आजार आहे त्यांनी काळजी घ्या, घरातच व्यायाम करा. लक्षणं दिल्याबरोबर रुग्णालयात जावा, घरीच उपचार करू नका - कोरोनावर औषधं नसली तर काळजी घेतली की कोरोना बरा होतो. त्यामुळे काळजी घेणं महत्त्वाचं आहे. कोरोनामुळे 'या' भारतीय खेळाडूचा मृत्यू, अखेरचा श्वास घेताना शेवटचा शब्द होता.... - इतर आजार असणाऱ्या रुग्णांना मदत करण्यासाठी डॉक्टरांनी पुढे या. सरकार तुमच्या पाठीशी आहे - उद्या मोदींशी पुन्हा चर्चा होणार आहे. अमित शहा यांचेही फोन येत आहेत. आपणही खूप प्रयत्न करत आहोत. - टाटा, मुकेश, विप्रो महिंद्रा या सगळ्यांचे आभार, आपल्या देशासाठी एकत्र येत काम केलं. - जगभरातून आपलं कौतूक होतं आहे. औषध येण्याआधी आपण जिंकू असं आंतरराष्ट्रीय मीडिया म्हणत आहे. हाच आत्मविश्वास माझाही आहे ईदच्या आधीच कोरोनाचं संकट संपेल अशी आशा, मोदींचा 'मन की बात'मधून देशाशी संवाद संपादन - उद्धव ठाकरे
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या