मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

पृथ्वीचं मोठं संकटं टळलं! ओझोनवरील छिद्र अचानक झालं बंद, हे कोरोनामुळे झालं?

पृथ्वीचं मोठं संकटं टळलं! ओझोनवरील छिद्र अचानक झालं बंद, हे कोरोनामुळे झालं?

हे छिद्र काही दिवसांपूर्वीपर्यंत खूप मोठं झालं होतं, ज्यामुळे संपूर्ण विज्ञान जग चिंतित होतं. परंतु नुकत्या हाती आलेल्या माहितीनुसार हे छिद्र पूर्णपणे बंद झालं आहे.

हे छिद्र काही दिवसांपूर्वीपर्यंत खूप मोठं झालं होतं, ज्यामुळे संपूर्ण विज्ञान जग चिंतित होतं. परंतु नुकत्या हाती आलेल्या माहितीनुसार हे छिद्र पूर्णपणे बंद झालं आहे.

हे छिद्र काही दिवसांपूर्वीपर्यंत खूप मोठं झालं होतं, ज्यामुळे संपूर्ण विज्ञान जग चिंतित होतं. परंतु नुकत्या हाती आलेल्या माहितीनुसार हे छिद्र पूर्णपणे बंद झालं आहे.

  • Published by:  Manoj Khandekar
नवी दिल्ली, 26 एप्रिल : मागच्या महिन्यात, उत्तर ध्रुवावर (North ole) आर्क्टिकच्या (Arcitc) ओझोन थरात (Ozone Layer) एक मोठं छिद्र पडलं होतं. पण आता आता हे छिद्र बंद झाल्याचं सांगण्यात येत आहे. हे छिद्र काही दिवसांपूर्वीपर्यंत खूप मोठं झालं होतं, ज्यामुळे संपूर्ण विज्ञान जग चिंतित होतं. परंतु नुकत्या हाती आलेल्या माहितीनुसार हे छिद्र पूर्णपणे बंद झालं आहे. कोरोनाच्या संकटातच छिद्र मोठं झालं आणि पुन्हा बंद झालं हे छिद्र अशा वेळी बनवलं गेलं होतं, जेव्हा संपूर्ण जग कोरोना संकटाशी झुंज देत आहे. यावेळी, जगभरातील आर्थिक आणि औद्योगिक व्यवसायांसह रस्त्यांवरची रहदारी ठप्प झाली आहे. बर्‍याच लोकांना वाटलं की, वायू प्रदूषणात झालेल्या सुधारणेमुळं हे छिद्र बंद झालं असावं. परंतु शास्त्रज्ञांनी यहा युक्तिवाद नाकारला आहे आणि त्यामागील खरं कारण सांगितलं आहे. कसं आणि का बंद झालं हे छिद्र, शास्त्रज्ञ म्हणाले.... उत्तर ध्रुवावर आर्क्टिकवर ओझोन जे भलं मोठं छिद्र तयार करत होता ते पूर्णपणे बंद झाल्याचं कॉपरनिकन अॅटमॉस्फियर ऑब्झर्वेशन सर्व्हिसने सांगितलं आहे. मागील महिन्यात या छिद्राने प्रचंड मोठा आकार घेतला होता. हे छिद्र दक्षिणी गोलार्धात पोहोचू शकेल अशी भीती शास्त्रज्ञांना होती पण तसं झालं नाही. शास्त्रज्ञांची वाढली होती काळजी ऑब्झर्वेशन सर्व्हिसने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, '2020 मध्ये उत्तर गोलार्धातील ओझोनवरील छिद्र बंद झालं आहे. या कमी तापमानामुळे मार्चमध्ये बनलेल्या या मोठ्या छिद्रानं शास्त्रज्ञांना धक्का बसला. यामुळे, अप्रिय घटनांची भीती देखील व्यक्त केली जात होती. पण असं काहीतरी घडण्यापूर्वीच हे छिद्र बंद झालं.' कोरोना विषाणूशी काय संबंध आहे? शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, कोरोना संकटाच्या वेळी ही घटना योगायोग आहे. कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे कमी झालेल्या प्रदूषणाची यामध्ये काही संबंध नाही. तर काही लोकांचा असा विश्वास आहे की, या काळात ग्रीनहाऊस गॅस कमी झाल्यानं हे छिद्र बंद होण्यास मदत झाली, परंतु शास्त्रज्ञांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, कोरोना परिणामाचा हे छिद्र बंद होण्याशी काही संबंध नाही. तर काय सांगितलं कारण? शास्त्रज्ञांचा दिलेल्या माहितीनुसार, हे छिद्र बंद होण्याचं कारण स्ट्रॅटोस्फीयर (Stratosphere) गरम होण्यामुळे आहे. एप्रिलपासून उत्तर ध्रुवाचं तापमान वाढू लागतं. यामुळे, आर्क्टिकच्या वरील स्ट्रॅटोस्फेरिक थर देखील गरम होऊ लागला आणि ओझोन थरात ओझोन वाढू लागतो. त्यामुळेच ते छिद्र बंद झालं.
First published:

Tags: Ozone, Research, Science

पुढील बातम्या