नवी दिल्ली, 26 एप्रिल : कोरोनाव्हायरसमुळे भारतीय वंशाच्या मॅरेथॉन धावपटू अमरिक सिंगचाही बळी गेला आहे. जगातील सर्वात वयोवृद्ध मॅरेथॉन धावपटू 109 वर्षीय फौजा सिंग यांचा सर्वात चांगला मित्र आणि धावपटू 89 वर्षीय अमरिकनं 22 एप्रिल रोजी बर्मिंघॅम सिटी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात, डॉक्टरांनी अमरिकी यांना वाचवण्यासाठी जितका संघर्ष करावा लागला तितकाच संघर्ष त्यांची भाषा समजून घेण्यासाठी लागला. तेच शब्द त्यांचे अखेरचे शब्द ठरले. अमरिक यांचे नातू, 34 वर्षीय पमन सिंग म्हणाले की, आजोबांचा शेवटचा शब्द ‘वाहेगुरु’ होता. ग्लास्गो इथे राहणारे अमरिक यांनी त्यांच्या मागे जगातील अनेक शर्यतीत जिंकलेल्या 650 हून अधिक पदकं ठेवली आहेत. 26 वेळा लंडन मॅरेथॉनमध्ये घेतला होता भाग अमरिक यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी वयाच्या 46 व्या वर्षी धावणं सुरू केलं आणि 26 वेळा लंडन मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. त्याच्या नातवाने सांगितलं की दरवर्षीप्रमाणेच, 12 फेब्रुवारी ते 13 मार्च दरम्यान अमरिक आपल्या मूळ गावी सेवा करण्यासाठी गेले होते. अमरिकचे मूळ गाव पंजाबच्या जालंधरमधील पाडडी खालसा इथं आहे. त्यांनी बेघर लोक आणि गरीब मुलांच्या शिक्षणासाठी देणग्या गोळा करून त्यांच्या मूळ गावात नेत्र तपासणी शिबिर स्थापन केलं.
Thread on my grandfather who passed away due to Covid-19 this afternoon.
— Paman Singh (@PamanSingh) April 22, 2020
1/ Sorry to post this, but it’s important we do not simply see statistics and remember the human impact. I am utterly heartbroken, my grandfather was admitted to hospital last Sunday with symptoms pic.twitter.com/cU9GMnzcD7
वैद्यकीय शिबिरातही ते रुग्णांच्या मदतीसाठी जात असतं. तिथे रुग्णालयांचे बेड तयार करणं, त्यांना वॉशरूममध्ये नेण्यास मदत करणं अशी कामं ते करायचे. स्कॉटलंडमध्ये त्यांनी जमा केलेली देणगी भारतातील त्यांच्या खेड्यातील गरीब मुलांमध्ये वाटली गेली. भारतात येण्यापूर्वी ते मुलांसाठी नवीन कपडे विकत घ्यायचे. असा सगळ्यांना माया लावणार माणूस आपण हरपल्यामुळे क्रिडा क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
The family of a great-grandfather who died from coronavirus is urging others to ‘be inspired by him and do one act of kindness for another person’. https://t.co/6mOw5F79a4 pic.twitter.com/hFeC9MhuIC
— STV News (@STVNews) April 25, 2020
पमन सिंग म्हणाले की, 13 मार्च रोजी ते बर्मिंघमहून भारतात परत आले आणि आपल्या मुलीच्या घरी थांबले. ते पूर्णपणे ठीक दिसत होते. सुरुवातीला त्यांना काही आरोग्या संदर्भात समस्या दिसल्या नाही, परंतु त्यांना नंतर बरं वाटत होतं. अचानक 12 एप्रिलला त्याच्यामध्ये विषाणूची लक्षणं दिसू लागली. नंतर त्याची चाचणीही सकारात्मक आली आणि अवघ्या दहा दिवसानतच त्यांनी जगाला निरोप दिला. संपादन - रेणुका धायबर