मुंबई, 01 जून- बिग बॉस मराठी सिझन २ च्या सदस्यांनी पहिल्या दिवसापासून घर गाजवलं. त्यांचं भांडण असो किंवा घरामध्ये झालेले टास्क, सगळ्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची मने जिंकण्यास सुरुवात केली आहे.
अभिजित बिचुकले यांचे इतर स्पर्धकांशी झालेले वाद, परागचे शिवानी, विणा, अभिजित केळकर यांच्याशी झालेलं भांडण, तसंच शिवानीचं विणा आणि शिवबरोबर झालेलं भांडण असो किंवा पराग आणि वैशालीमध्ये टास्क दरम्यान उडालेली वादाची ठिणगी असो या सगळ्याबद्दल आज महेश मांजरेकर स्पर्धकांशी बोलतील.
घरात रंगलेली अंताक्षरीही प्रेक्षकांनी चांगलीच एन्जॉय केली. एकंदरीत बिग बॉस मराठी सिझन २ ची धडाक्यात सुरुवात झाली आणि पाहता पाहता पहिला आठवडा संपतदेखील आला.
आता घरातील सदस्यांनी केलेल्या वर्तणुकीचा, कामाचा आढावा घेण्याची वेळ आली आहे. एकंदरीत हा आठवडा कसा गेला? कोण चुकलं? कोण बरोबर होत?
तसेच जे चुकले त्यांना मार्गदर्शन करण्याची आणि जे अजूनही घरामध्ये असून नसल्यासारखे आहेत त्यांना जाग करण्याची जबाबदारी आज महेश मांजरेकर उचलणार आहेत. आजचा विकेण्डचा डाव चांगलाच रंगेल यात काही शंका नाही.