दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूरने रिक्रिएट केलं बलम पिचकारी गाणं, तुम्ही पाहिलात का VIDEO?

दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूरने रिक्रिएट केलं बलम पिचकारी गाणं, तुम्ही पाहिलात का VIDEO?

दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या स्टेटसमध्ये हा व्हिडिओ शेअर केला असून ‘नैना आणि बनी नाचताना…’ असं कॅप्शनही त्याला दिलं

  • Share this:

मुंबई, 01 जून- बॉलिवूडचा चॉकलेट बॉय आणि मस्तानी दीपिका पदुकोणचा ‘ये जवानी है दिवानी’ हा सिनेमा कोणाला माहीत नाही असं तर होऊ शकत नाही. सहा वर्षांपूर्वी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. ३१ मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. यामुळेच सोशल मीडियावर ये जवानी है दिवानी सिनेमा ट्रेण्डमध्येही होता. सिनेमाचे कट्टर चाहते यातील अनेक संवाद आणि गाणी सोशल मीडियावर शेअर करत होते.

सिनेमाला सहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दलरणबीर आणि दीपिकाने एक खास परफॉर्मन्स दिला. सिनेमातील नैना आणि बनी यांनी बलम पिचकारी या गाण्यावर डान्स करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. विशेष म्हणजे रणबीर आणि दीपिकाचा हा डान्स रणवीर सिंगने स्वतः शूट केला आहे. हा व्हिडिओ शूट करताना रणवीर दोघांना चिअर करतानाचा आवाज ऐकू येतो.

बायकोला खुश करण्याच्या नादात रितेश देशमुख झाला ट्रोल, लोकांनी विचारलं ‘माणूस आहेस की पोपट?’

जोरदार हवेने 'या' अभिनेत्रीला दिला त्रास, असा सांभाळावा लागला ड्रेस

दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या स्टेटसमध्ये हा व्हिडिओ शेअर केला असून ‘नैना आणि बनी नाचताना…’ असं कॅप्शनही त्याला दिलं आहे. सध्या दीपिकाचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे.

दीपिकाच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर लवकरच ती मेघना गुलझार दिग्दर्शित ‘छपाक’ सिनेमात दिसणार आहे. तसेच रणवीर सिंगने कपिल देव यांचा बायोपिक ‘८३’ च्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. तर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात काम करत आहेत.

...म्हणून आमिर खानच्या ऑफिससमोरच चाहत्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

VIDEO: धक्कादायक! इडली बनवण्यासाठी शौचालयातील पाण्याचा वापर

First published: June 1, 2019, 1:53 PM IST

ताज्या बातम्या