मुंबई, 8 ऑगस्ट: महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरण्याआधी कुणाकुणाची वर्णी मंत्रिपदावर लागणार हे समजण्याआधीच एका मोठ्या राजकीय नेत्याचा पत्ता कट होऊ शकतो असा घोटाळा बाहेर आला आहे. शिक्षक भरती घोटाळ्यात सिल्लोडचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या नातेवाईकांचं नाव समोर आलं आणि मोठी बातमी झाली. TET घोटाळ्याच्या यादीत अब्दुल सत्तार यांच्या तीन मुली आणि एका मुलाचे नाव आल्याने खळबळ उडाली आहे. TET म्हणजे शिक्षक भरतीसाठी आवश्यक पात्रता चाचणी पास झालेली नसूनही अब्दुल सत्तारांच्या मुलीची शिक्षिका म्हणून वर्णी लागली. एवढंच नाही तर अपात्र असतानाही हीना कौसर अब्दुल सत्तार शेख यांना 2017 पासून थोडा थोडका नाही तर भरभक्कम पगारही मिळत असल्याचं उघड झालं आहे. याला निमित्त ठरली आहे हीना सत्तार खान यांची सॅलरी स्लिप. सत्तार यांची मुलगी हीना कौसर अब्दुल सत्तार शेख या टीईटी परीक्षेत अपात्र असताना 2017 पासून त्यांना पगार कसा मिळत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यांच्या नावाची Sakary slip News18lokmat च्या हाती आली आहे. हे प्रकरण आता आणखी तापू शकतं. TET घोटाळ्याची आता आणखी जलद चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाचा - म्हाडा पेपर फुटीतून TET घोटाळा समोर, अब्दुल सत्तार अडचणीत कसे आले? Inside Story शिक्षण विभागाच्या रेकॉर्डनुसार, 2017 पासून ते जुलै 2022 या वर्षांमध्ये हीना शेख हिला पगार मिळाला आहे. यादरम्यान हीनाला मासिक वेतन हे 40 हजारांपर्यंत मिळत असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे खुद्द अब्दुल सत्तार यांनीच त्यांची मुलगी टीटीईटी अपात्र असल्याची माहिती माध्यमांना दिली आहे. त्यामुळे जर त्या अपात्र होत्या तर मग त्या पगार कुठल्या निकषावर उचलतात हाही प्रश्न या निमित्ताने उभा राहत आहे. सत्तार यांची मुलगी हीना कौसर अब्दुल सत्तार शेख या टीईटी परीक्षेत अपात्र असताना 2017 पासून त्यांना पगार कसा मिळत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण आहे ही 90 हजारांची सॅलरी स्लिप.
सत्तार यांची मुलगी हीना कौसर अब्दुल सत्तार शेख या टीईटी परीक्षेत अपात्र असताना 2017 पासून त्यांना पगार कसा मिळत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण आहे ही 90 हजारांची सॅलरी स्लिप. #MaharashtraPolitics #AbdulSattar pic.twitter.com/iHzXXEhspg
— News18Lokmat (@News18lokmat) August 8, 2022
शिक्षण उपसंचालक कार्यालयातून पात्रता निकष पडताळणी केली जाते त्यानुसार आमच्या कार्यालयातून पगार पत्रक निघतात असेही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.