बाप्पाचा निरोप भक्तासाठी ठरला अखेरचा, तलावात बुडून झाला मृत्यू

बाप्पाचा निरोप भक्तासाठी ठरला अखेरचा, तलावात बुडून झाला मृत्यू

20 वर्षाचा तरुण बुधवारी रात्री गावातील गणपती मूर्ती विसर्जनासाठी तलावात उतरला होता. पण तलाव खूप खोल होतं आणि त्याला पाण्याचा अंदाज आल्यामुळे तो बुडाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

वाशिम, 12 सप्टेंबर : लाडक्या बाप्पाला अखेर निरोप देण्यासाठी आज अवघा महाराष्ट्र सज्ज झाला आहे. बाप्पाच्या या महाउत्सवाची सांगता करण्यासाठी मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. गणेश विसर्जन स्थळीदेखील मोठा बंदोबस्त आहे. पण या उत्सवात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गणपती विसर्जना करण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा तलावात बुडुन मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. रात्री उशिरा ही घटना घडली.

मंगरुळपिर तालुक्यातील मसला गावातील तेजस भगत हा युवक बुधवारी रात्री गावातील गणपती मूर्ती विसर्जनासाठी तलावात उतरला होता. पण तलाव खूप खोल होतं आणि त्याला पाण्याचा अंदाज आल्यामुळे तो बुडाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी 9 च्या दरम्यान तेजस भगतचा मृतदेह पिंजरच्या गाडगेबाबा आपत्कालीन पथकाने शोधूव काढला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, या अपघाती मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली असून पोलीस संपूर्ण प्रकरणाचा शोध घेत आहे. तर या घटनेनंतर ज्याला पोहता येत त्यानेच तलावात विसर्जनासाठी जायचं अशा सूचना देण्यात आल्या आहेत. बाप्पाच्या विसर्जनाला अशी घटना घडल्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

इतर बातम्या - बाप्पाची आरती ठरली अखेरची, 10 वर्षाच्या चिमुकल्याला...

पोलिसांनी तेजसचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घरातल्या तरुण मुलाला अशा प्रकारे गमावल्यामुळे भगत कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तर आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा मोठा धक्का त्यांना बसला आहे.

इतर बातम्या - उदयनराजेंचं भाजप प्रवेशावर काय ठरलं?, तातडीने घेणार शरद पवारांची भेट

साताऱ्यात भीषण दुर्घटना, ट्रक-ट्रॅव्हल्सच्या अपघातात 6 जणांचा मृत्यू

पुणे-बंगळुरू महामार्गावर ट्रक आणि ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. साताऱ्यातील डी-मार्टसमोर हा अपघात झाला आहे. ट्रकला मागील बाजूनं येणाऱ्या ट्रॅव्हलनं जोरदार धडक दिल्यानं ही दुर्घटना घडली. अपघातग्रस्त प्रवासी कर्नाटकातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेनं जात असताना गुरुवारी (12 सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

इतर बातम्या - 'भाऊ म्हणून दादा म्हणावं की...', मनसेच्या महिला नेत्याचा चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप

VIDEO: आभाळ भरलं होतं तू येताना, डोळे भरून आले तू जाताना!

First published: September 12, 2019, 10:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading