उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर जोरदार चर्चा, तातडीने घेणार शरद पवारांची भेट

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर जोरदार चर्चा, तातडीने घेणार शरद पवारांची भेट

या भेटीवेळी धनंजय मुंडे, शशिकांत शिंदे हेदेखील सोबत असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. उदयनराजे भोसले हे भाजपात जाणार अशा जोरदार चर्चा असतानाच ही भेट होत आहे.

  • Share this:

पुणे, 12 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा असताना त्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज गुरुवारी उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहे. पुणे इथल्या मोदीबागेत सकाळी 10 वाजता ही भेट होणार आहे. त्यामुळे खरंतर उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशावर मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

या भेटीवेळी धनंजय मुंडे, शशिकांत शिंदे हेदेखील सोबत असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. उदयनराजे भोसले हे भाजपात जाणार अशा जोरदार चर्चा असतानाच ही भेट होत आहे. त्यामुळे या भेटीमध्ये नेकमी कोणत्या विषयावर चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, उदयनराजे भोसले यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी मंगळवारी बैठक झाली. यावेळी उदयनराजे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. यामध्ये उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाबाबत खलबतं झाली असल्याची माहिती आहे.

उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. मात्र, अद्यापही त्यांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब होऊ शकलेलं नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा उदयनराजेंसोबत चर्चा केली. उदयनराजेंनी केलेल्या मागण्या पूर्ण होत नसल्याने त्यांचा भाजप प्रवेश बारगळल्याचं चित्र आहे.

इतर बातम्या - 'भाऊ म्हणून दादा म्हणावं की...', मनसेच्या महिला नेत्याचा चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप

दरम्यान, भाजप प्रवेशाच्या मुद्द्यावर उदयनराजे आणि त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांची एक बैठक पार पडली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांनी उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाबाबत नकारात्मक सूर आळवला. 'राष्ट्रवादीत राहायचं की भाजपमध्ये जायचं याबाबत आमचा अजून कोणताच निर्णय झाला नाही,' अशी माहिती खासदार उदयनराजेंसोबतच्या बैठकीनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली होती. भाजपकडून मागण्या मान्य होत नसल्याने उदयनराजेंनी यू-टर्न घ्यावा असा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचीही माहिती आहे.

खासदारीच्या राजीनाम्यानंतर विधानसभेची आणि लोकसभेची पोट निवडणूक एकत्र लावण्यासाठी उदयनराजेंचा आग्रह आहे. मात्र ही मागणी पूर्ण होत नसल्याने उदयनराजे संभ्रमात असल्याची माहिती आहे.

SPECIAL REPORT : समस्या दूर करा नाहीतर मुख्यमंत्र्यांचं श्राद्ध घालू, विठुरायाच्या नगरीत विद्यार्थ्यांचा टाहो!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2019 09:06 AM IST

ताज्या बातम्या