बाप्पाची आरती ठरली अखेरची, 10 वर्षाच्या चिमुकल्याला...

बाप्पाची आरती ठरली अखेरची, 10 वर्षाच्या चिमुकल्याला...

घरातल्या मुलाला अशा पद्धतीने गमावल्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे तर संपूर्ण परिसरातून यावर शोक व्यक्त करण्यात येत आहे.

  • Share this:

शिर्डी, 05 सप्टेंबर : ऐन गणेशोत्सवात शिर्डीमध्ये बिबट्याच्या हल्ल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री लाडक्या बाप्पाची आरती करून घरी परत येत असताना बिबट्याने हल्ला करून एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिर्डीतल्या राहाता तालुक्यातील कुरणपूर गावात हा प्रकार घडला आहे. अनेक दिवसांपासून बिबट्याचा या परीसरात धुमाकूळ सूरू आहे. पण, वनविभागाने वेळीच बंदोबस्त न केल्याने मुलाचा नाहक बळी गेल्याने नागरिक संतत्प झाले आहेत.

काल रात्री 9 वाजेच्या दरम्यान राहाता तालुक्यातील कुरणपूर इथल्या देठे वस्तीवरची ही खळबलजनक घटना आहे. 10 वर्षीय दर्शन देठे हा गणपतीची आरती संपल्यानंतर आपल्या चुलती आणि इतरांसोबत घराकडे चाललेला असताना ऊसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालून दर्शनला ऊसाच्या शेतात ओढत नेल. आरडा-ओरड सुरू झाल्यानंतर परीसरातील नागरीक जमा झाले आणि दर्शनची ऊसाच्या शेतात शोधाशोध सुरू केली.

इतर बातम्या - मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, विश्रांतीनंतर आज दिवसभर असा असेल पावसाचा जोर

उशिरापर्यंत शोध घेतल्यानंतर गंभीर जखमी झालेला दर्शन हा सापडला. त्याला उपचारासाठी लोणी इथल्या प्रवरा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी दर्शनचा मृच्यू झाल्याचं सांगितल्याने त्याच्या कुटूंबावर मोठा आघात झाला. घरातल्या मुलाला अशा पद्धतीने गमावल्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे तर संपूर्ण परिसरातून यावर शोक व्यक्त करण्यात येत आहे. गावात बिबट्याचा वावर असल्यामुळे गावात भीतीचं वातावरण होतं. याबद्दल वनविभागाला वारंवार माहिती देऊनही कोणतंही पाऊल उचललं गेलं नाही. त्यामुळे गर्शनचा नाहक बळी गेला.

अनेक दिवसांपासून या परीसरात बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे. आजवर शेतकऱ्यांच्या जनावरांना लक्ष करणाऱ्या बिबट्याने मुलाचा बळी घेतल्याने नागरीक संतप्त झाले आहेत. या मुलाच्या मृत्यूस वनविभाग जबाबदार असल्याचा आरोप करत आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

मुंबईकरांना दिलासा, तिन्ही मार्गावरील लोकल सेवा सुरू, इतर टॉप 18 बातम्या

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 5, 2019 11:07 AM IST

ताज्या बातम्या