कल्याण, 16 ऑक्टोबर: काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 33 जणांनी सामूहिक अत्याचार (Dombivli Gang Rape) केल्याची घटना उघडकीस आली होती. नराधमांनी अश्लील व्हिडीओ व्हायरल (Viral video) करण्याची धमकी देत पीडितेवर अनेकदा अत्याचार केला होता. ही घटना ताजी असताना, आता कल्याणमधून नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच नातेवाईकाकडून लैंगिक अत्याचार (Minor girl raped by relative) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने सात वर्षांपूर्वी पीडितेवर अत्याचार केला होता. तेंव्हापासून पीडित मुलगी मानसिक दबावाखाली वावरत होती. अखेर तिने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली आहे.
याप्रकरणी कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी 64 वर्षीय आरोपी नातेवाईकाला बेड्या (Accused relative arrested) ठोकल्या आहे. पीडित मुलीचं सध्याचं वय 14 वर्षे आहे. अत्याचार झाल्यापासून पीडित मुलगी कोणाशीही फारसं बोलत नव्हती. सतत विचारात मग्न असायची. पण तिची ही मानसिक स्थिती विचारात घेऊन तिच्या मोठ्या बहिणीनं तिला विश्वासात घेत, बोलतं केलं. यानंतर पीडितेनं सात वर्षांपूर्वी तिच्यासोबत घडलेली आपबिती आपल्या कुटुंबीयांना सांगितली आहे.
हेही वाचा-Tinderवरील मित्रानं केला विश्वासघात; पुण्यातील IT अभियंता तरुणीला 73लाखांचा गंडा
मुलीसोबत घडलेला प्रकार ऐकून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. ही घटना उघडकीस येताच, पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.
हेही वाचा-बर्थ डे पार्टीला बोलावून महिला डॉक्टरवर बलात्कार; एम्समधील वरिष्ठ डॉक्टरचं कृत्य
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2014 साली पीडित मुलगी आपल्या कुटुंबासह एका नातेवाईकाच्या घरी काही दिवस राहण्यासाठी गेले होते. दरम्यान, पीडितेच्या नात्यातील 64 वर्षीय आरोपीनं पीडित मुलीवर काही वेळा लैंगिक अत्याचार केला. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर घटनेची वाच्यता कुठेही केल्यास, तुझ्या लहान बहिणीवर देखील अत्याचार करेल, अशी धमकी दिली होती. आरोपीच्या धमकीला घाबरून पीडितेनं घटनेची वाच्यता कुठेही केली नाही. पण बलात्काराचा तिच्या मनावर मोठा आघात झाला. तेव्हापासून मानसिक दबावाखाली वावरत होती. अखेर सात वर्षांनंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे. या घटनेची पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kalyan, Rape on minor