मराठी बातम्या /बातम्या /देश /बर्थ डे पार्टीला बोलावून महिला डॉक्टरवर बलात्कार; एम्स रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरचं धक्कादायक कृत्य

बर्थ डे पार्टीला बोलावून महिला डॉक्टरवर बलात्कार; एम्स रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरचं धक्कादायक कृत्य

देशातील सर्वोच्च वैद्यकीय संस्था असलेल्या एम्स रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टरने वाढदिवसाला आलेल्या एका महिला डॉक्टरवर बलात्कार (AIIMS Senior doctor raped junior female doctor) केला आहे.

देशातील सर्वोच्च वैद्यकीय संस्था असलेल्या एम्स रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टरने वाढदिवसाला आलेल्या एका महिला डॉक्टरवर बलात्कार (AIIMS Senior doctor raped junior female doctor) केला आहे.

देशातील सर्वोच्च वैद्यकीय संस्था असलेल्या एम्स रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टरने वाढदिवसाला आलेल्या एका महिला डॉक्टरवर बलात्कार (AIIMS Senior doctor raped junior female doctor) केला आहे.

दिल्ली, 15 ऑक्टोबर: देशातील सर्वोच्च वैद्यकीय संस्था असलेल्या एम्स रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टरने वाढदिवसाला आलेल्या एका महिला डॉक्टरवर बलात्कार (AIIMS Senior doctor raped junior female doctor) केला आहे. अत्याचाराची ही घटना उघडकीस येताच, एम्स प्रशासनात खळबळ उडाली आहे. पीडित महिला डॉक्टरच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी आरोपी डॉक्टरविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल (FIR Lodged) केला आहे. पीडितेनं गुन्हा दाखल करताच संशयित आरोपी डॉक्टर हा फरार झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी डॉक्टरच्या शोधासाठी पोलीस पथकं तयार केली आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

आरोपी डॉक्टर आणि पीडित महिला डॉक्टर दिल्लीतील एम्स रुग्णालयात एकत्र काम करतात. दरम्यान, 10 ऑक्टोबर रोजी एम्स रुग्णालयातील एका सहकारी डॉक्टरचा वाढदिवस होता. संबंधित डॉक्टरने पीडितेला वाढदिवसाच्या पार्टीसाठी आमंत्रित केलं होतं. यावेळी बर्थ डे पार्टीसाठी अन्य डॉक्टर आणि मित्र परिवार देखील उपस्थित होता. त्याचबरोबर याठिकाणी आरोपी डॉक्टर देखील होता.

हेही वाचा-मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीचा हॉस्टेलमध्ये गळफास; रात्री 3 वा. खोलीत गेली आणि.

बर्थ डे पार्टीच्या दिवशी आरोपी डॉक्टरने संधी साधून सहकारी महिला डॉक्टरवर बलात्कार केला आहे. याप्रकरणी मॅजिस्ट्रेटसमोर पीडित महिलेचा जबाब नोंदवण्यात आला आहे. ही घटना 10 रोजी रात्री घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. बलात्काराची पुष्टी होताच हौसखाज पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे.

हेही वाचा-प्रसिद्ध डॉक्टरचं पुरुष रुग्णासोबत विकृत कृत्य; स्टिंग ऑपरेशनमधून काळंबेरं उघड

गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी डॉक्टर फरार झाला आहे. त्यामुळे आरोपी डॉक्टरला पकडण्यासाठी अनेक अडचणी येत आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलीस टेक्निकल सर्व्हिलान्सची मदत घेत आहे. अद्याप आरोपी डॉक्टराचा काहीही थांगपत्ता सापडला नसून पोलीस शोध घेत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Delhi, Rape