बीड, 25 एप्रिल : बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाई (ambajogai) येथे दोन दिवसांमध्ये तब्बल 30 कोरोनाबाधित (Corona) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृतदेहांवर (Corona dead) आज नगर परिषदेच्या वतीने एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र स्मशानभूमीत मृतदेहांना नेत असताना एकाच रुग्णवाहिकेमध्ये (ambulance) नेण्यात आले होते. एकीकडे कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करत असताना आरोग्य यंत्रणेकडून बऱ्याच वेळा चुका होत असताना दुसरीकडे आता मृत्यू झाल्यानंतर देखील मृतदेहाची अशा पद्धतीने विल्हेवाट लावली जात असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, रुग्णांचा वाढता आकडा आणि मृत्यूचा दर यामुळे आरोग्य यंत्रणा पुरती कोलमडून गेल्यामुळे अशा पद्धतीने सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा वाढला आकडा चिंताजनक असताना मृत्युदर देखील वाढला आहे. यातच अंबाजोगाई तालुक्यात प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृतांची संख्याही वाढत असल्याने भयावह परिस्थिती आहे. शनिवार व रविवार या दोनच दिवसात अंबाजोगाईत कोरोनामुळे मृत झालेल्या 30 रुग्णांवर नगरपरिषदेने अंत्यसंस्कार केले.
यात 28 जणांना अग्नीडाग तर दोन जणांचा दफनविधी करण्यात आला आहे. तर दोन दिवसात तब्बल 1800 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या अंबाजोगाईतील स्वाराती आणि लोखंडीच्या कोविड सेंटरमध्ये मिळून हजारांपेक्षाही अधिक कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. तर, अनेक जण, गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. दररोज शेकडो रुग्ण कोरोनामुक्त होत असल्याचे चित्र दिलासादायी असले तरी दुसऱ्या लाटेतील मृत्यूंची आकडेवारी मात्र चिंतेत भर घालणारी आहे.
खरेदी करून दुचाकीवरुन परतत होता नवरदेव;लग्नाच्या 2 दिवसांपूर्वी कुटुंबावर शोककळा
जिल्ह्यात दररोज हजाराच्या वर कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यांच्यावर उपचार करत असताना जिल्हा आरोग्य यंत्रणा तोकडी पडत असल्याचं दिसून येत आहे. जिल्ह्यात ॲक्टिव रुग्णांची संख्या आठ हजारांच्या घरात आहे. त्या रुग्णांना सेवा देत असताना आरोग्य यंत्रणेच्या नाकीनऊ आले आहेत.
आधी मिरची पूड टाकली नंतर चाकूने केले सपासप वार, जावयाने केली सासूची हत्या
जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हचा दर आणि मृत्यूचा दर देखील वाढला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार करत असताना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातच 2 दिवसात अंबाजोगाईमध्ये रुग्णांचा मृत्यू झाला त्यांच्यावर ते एकाच वेळी अंत्यसंस्कार करत असताना एकच रुग्णवाहिकेतून नेण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या मृत्युदर चिंताजनक असल्याने भीती व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.