मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

आधी मिरची पूड टाकली नंतर चाकूने केले सपासप वार, जावयाने केली सासूची हत्या

आधी मिरची पूड टाकली नंतर चाकूने केले सपासप वार, जावयाने केली सासूची हत्या

 राहुल हा पूर्वीपासून सराईत गुन्हेगार होता.  राहुल मोहिते आणि चुलत भाऊ यांच्याबरोबर जमिनीवरुन नेहमी वाद करत होता.

राहुल हा पूर्वीपासून सराईत गुन्हेगार होता. राहुल मोहिते आणि चुलत भाऊ यांच्याबरोबर जमिनीवरुन नेहमी वाद करत होता.

साळेगावजवळ रस्त्यावरच जावई आणि सासूमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. यात जावयाने सासू आणि पुतण्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून धारदार शस्त्राने वार केले.

बीड, 25 एप्रिल : पुतण्यासोबत दुचाकीवर जाणाऱ्या 35 वर्षीय सासूचा (Mother-in-law) जावयाने (Son-in-law) भर रस्त्यात अडवून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक घटना बीड (Beed) जिल्ह्यातील साळेगावजवळ उघडकीस आली आहे. यामुळे खळबळ उडाली या हल्ल्यात दुचाकीचालक पुतण्या देखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोचना माणिक धायगुडे (35) असं मयत सासूचे नाव आहे. तर अंकुश दिलीप धायगुडे असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर आरोपी अमोल वैजनाथ इंगळे असं जावयाचं नाव आहे.

भयावह भंडारा, स्मशानभूमीत आधी सरण तयार, 20-25 जणांवर होतो अंत्यसंस्कार, VIDEO

अंबाजोगाई तालुक्यातील धायगुडा पिंपळा रहिवाशी लोचना माणिक धायगुडे आणि  पुतण्या अंकुश दिलीप धायगुडे हे दुचाकीवरुन केजकडे जात होते. यावेळी साळेगावजवळ रस्त्यावरच  जावई आणि सासूमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. यात जावयाने सासू आणि पुतण्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून धारदार शस्त्राने वार केले. यात लोचना धायगुडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा पुतण्या अंकुश दिलीप धायगुडे हा गंभीर जखमी झाला.

संकेत-सुगंधाच्या घरी लगीनघाई; पाहा मेहंदी सोहळ्याचे खास क्षण

त्यानंतर जावई दुचाकी घेऊन फरार झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच केज पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या महिलेचा खून का आणि कशासाठी केला याचा तपास पोलीस घेत आहेत. आरोपीच्या अटकेसाठी पथक नेमले आहेत, अशी माहिती पोलीस अधिकारी भास्कर सावंत यांनी दिली.

First published:

Tags: बीड