Home /News /maharashtra /

खरेदी करून दुचाकीवरुन परतत होता नवरदेव; लग्नाच्या 2 दिवसांपूर्वी कुटुंबावर शोककळा

खरेदी करून दुचाकीवरुन परतत होता नवरदेव; लग्नाच्या 2 दिवसांपूर्वी कुटुंबावर शोककळा

खरेदीसाठी नवदेव राजू हा शनिवारी दुचाकीवरून हिमायतनगर इथं गेला होता. तिथून खरेदी करून परत येत असताना राजू याच्या दुचाकीला दुसऱ्या एका दुचाकीनं मागून धडक दिली.

    नांदेड, 25 एप्रिल : जिल्ह्यातील खडकी फाटा इथं एका दुर्दैवी घटनेमध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे तीन दिवसांनंतर या (Groom died in accident before 3 days of marriage) तरुणाचा विवाह होणार होता. पण त्यापूर्वीच अपघातामध्ये काळानं घाला घातला आणि या तरुणाचा त्यात मृत्यू झाला. त्यामुळं संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. (वाचा-अपहरण करुन कुटुबीयांदेखत तरुणीवर अतिप्रसंग, बुलडाण्यातील धक्कादायक घटना) नांदेडच्या वाळकेवाडी या ठिकाणच्या राजू वाळके याचा 27 एप्रिल रोजी विवाह नियोजित होता. या विवाह सोहळ्यासाठी घरात तयारी आणि लगबग सुरू होती. घरासमोर मांडव घातलेला होता. कोरोनाच्या निर्बंधांमुळं सोहळा छोटेखानी असला तरी तयारीसाठी लहान मोठी खरेदी सुरू होती. अशाच खरेदीसाठी नवदेव राजू हा शनिवारी दुचाकीवरून हिमायतनगर इथं गेला होता. तिथून खरेदी करून परत येत असताना राजू याच्या दुचाकीला दुसऱ्या एका दुचाकीनं मागून धडक दिली. या अपघातात राजू वाळके याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील दोन जण जखमी झाले. कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये आधीच सोहळे, कार्यक्रम यावर बंदी आहे. त्यामुळं कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत नाहीत. त्यातही काही लोकं मोजक्या लोकांमध्ये सोहळे करत आहेत. मात्र लग्नाच्या तीन दिवसांपूर्वीच अशी घटना घडल्यानं संपूर्ण वाळके कुटुंबावर मात्र शोककळा पसरली आहे. (वाचा-वराचं वागणं वधूला खटकलं; ऐनवेळी नकार दिल्यानं वराला लग्नाविनाच परतावं लागलं) नांदेडमध्येच आणखी एक दुर्दैवी घटना दरम्यान, नांदेडमध्येच एका अंगणवाडी सेविकेनं आत्महत्या केल्याची घटनाही घडली आहे. लॉकडाऊनमुळं पतीचा व्यवसाय बंद पडला. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला. मुलीच्या लग्नासाठी पैसे कसे जमवायचे या सगळ्या चिंतांनी घेरल्यानंतर अखेर वर्षा कदम यांनी गळफास घेत आत्महत्या केली. लोहा येथील कारेगावमध्ये ही घटना घडला. कोरोनानं अनेकांना आर्थिक संकटात टाकल्यामुळं आता त्याचे परिणाम दिसायला लागले आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bike accident, Crime news

    पुढील बातम्या